संगमनेर : नाशिक- पुणे राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन वर्षे वयाचे मादी तरस ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा घडली.
बोटा परिसरातील नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर शिकारीच्या शोधात असणारा दोन वर्ष वयाचा मादी जातीचा तरस हा पुणे नाशिक-राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना त्याला अज्ञात वाहनाची धडक बसल्याने हे तरस मृत्युमुखी पडले असावे अशी माहिती स्थानिकांनी दिली. याबाबत वनविभागाला कळविण्यात आल्यावर वन कर्मचाऱ्यांनी या मृत्युमुखी पडलेल्या तरसाला ताब्यात घेत त्याच्यावर पुढील सोपस्कार पार पाडले. दरम्यान तालुक्यातील गावागावात आता बिबट्यांपाठोपाठ तरसाची ही एन्ट्री झाल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.