पोहेगांव ( वार्ताहर) : कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा असून पोहेगांव शाखेमार्फत परिसरात येणाऱ्या 11 सहकारी सोसायटीना मागील आर्थिक वर्षात दहा कोटी आठरा लाख सहा हजार रुपये इतके कर्ज वाटप करण्यात आले होते. या सर्व कर्जाची वसुली परिसरातील 11 संस्थेने 30/6 अखेर दिल्याने अहमदनगर जिल्हा बँकेच्या पोहेगाव शाखेची शंभर टक्के वसुली झाली असल्याची माहिती अण्णासाहेब पानगव्हाणे यांनी दिली.
पोहेगाव बँकेच्या शाखेंअंतर्गत हनुमान विकास सोसायटी पोहेगाव, कोपरगाव तालुका सीड्स सोसायटी पोहेगाव,मा आ के बी रोहमरे कृषी फलोद्यान सोसायटी पोहेगाव,कै शिवराम पाटील जावळे नगदवाडी विकास सोसायटी, सप्तशृंगी विकास सोसायटी सोनेवाडी, पोहेगाव नंबर एक सोसायटी, पोहेगाव नंबर दोन सोसायटी,मा आ दादासाहेब शहाजी रोहमारे पोहेगाव खुर्द सोसायटी, पोहेगाव भाग कृषी फलोद्यान सोसायटी, सोनेवाडी विविध कार्यकारी सोसायटी, श्रीकृष्ण विविध कार्यकारी सोसायटी अदी सोसायटीतील कर्जदार सभासदांना 10 कोटी,18 लाख,6 हजार रुपये कर्ज वाटण्यात आली होते. त्या कर्जाची 30 जुन अखेर सभासदांनी वसुली देत खाते निरंक केले. गेल्या तीन वर्षापासून सलग पोहेगाव जिल्हा बँक 30 जुन अखेर शंभर वसुली देत आहे. जिल्हा बँकेच्या शंभर टक्के वसुली कमी सर्व संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळ, सचिव, बँक इन्स्पेक्टर सुनील चौधरी, शाखाधिकारी अण्णासाहेब पानगव्हाणे यांनी विशेष प्रयत्न केले. सभासदांनी सहकारी सोसायटी मार्फत घेतलेले मार्च एंड व 30 जून अखेर वेळेत भरले तर कर्जदार सभासदांना केंद्र सरकारकडून तीन टक्के व्याजदराचा व राज्य सरकारकडून तीन टक्के व्याजदरचा परतावा मिळतो. त्यामुळे सभासदांनी घेतलेले कर्ज हे बिगरव्याजी शेतकऱ्यांना वापरास मिळते. वेळेत कर्ज फेड केल्याने हा लाभ मिळत असल्याची माहिती बँकेचे शाखाधिकारी अण्णासाहेब पानगव्हाणे यांनी दिली.