कोपरगाव : अहिल्यानगर बेसबॉल असोसिएशन व के.जे. सोमैया महाविद्यालय कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित अहिल्यानगर बेसबॉल प्रीमियर लीग पर्व -१ले आयोजन शनिवार दिनांक ३० नोव्हेंबर व रविवार दिनांक ०१ डिसेंबर २०२४ रोजी के. बी पी. विद्यालय येथे करण्यात आले होते. बेसबॉल लीग या स्पर्धेचे मध्ये आठ संघ मालकांच्या आठ संघाने भाग घेतला.त्यामध्ये श्रीमंत पावन गणेश मंदिर संघमालक सागरभाऊ ढोणे शिव साई आदर्श संघमालक जगदीशभाऊ लकारे चंद्रयोग संघमालक पंकज नाईकवाडे स्टाईक झोन संघ मालक शमित माळी, ब्राईट मांडी ग्लोबल स्कुल संघ मालक सुजित रोहमारे आक्रमण संघमालक बबलू केकान फूड हब संघमालक गौरव जेजुरकर निधी कन्स्ट्रक्शन संघमालक गणेशराव गाडेकर हे सहभागी झाले होते.
या स्पर्धेचे संयोजन अरुण चंद्रे अध्यक्ष,अहिल्यानगर बेसबॉल असोसिएशन मकरंद कोऱ्हाळकर सचिव, अहिल्यानगर बेसबॉल असोसिएशन. डॉ.प्रा. सुनिल कुटे क्रीडा संचालक के.जे.सोमय्या महाविद्यालय यांनी केले.या स्पर्धेत जिल्हातुन ११०खेळाडु सहभागी झाले. अंतिम सामना आक्रमण विरुद्ध चंद्रयोग या संघामध्ये झाला या सामन्यामध्ये चंद्रयोग या संघाने ४-२ अश्या धावांच्या फरकाने अंतिम सामना जिंकला.या स्पर्धेचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख यांनी केले.तर बक्षिस वितरण संजीवनी उद्योग समूहाचे पराग संधान यांच्या हस्ते संपन्न झाले.या प्रसंगी पराग संधान म्हणाले की क्रिकेट या लोकप्रिय खेळाच्या बरोबरीने बेसबॉल या खेळाची प्रीमियर लीग बहुधा महाराष्ट्रात पहिल्यांदाच आणि कोपरगांवात आयोजित होत आहे या बाबत संयोजकाची त्यांनी कौतुक केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक असोसिएशनचे सचिव मकरंद कोऱ्हाळकर यांनी तर आभार असोसिएशनचे अध्यक्ष अरुण चंद्रे यांनी मानले.
कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सचिव अॕड.संजीव कुलकर्णी, सदस्य संदीप रोहमारे,प्राचार्य डॉ. विजय ठाणगे,माजी नगरसेवक सत्येन मुंदडा,के.बी.पी.विद्यालयाचे प्राचार्य शहाजी सातव,महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनचे सचिव राजेंद्र इखणकर, दिपेश सोळंके,अहिल्यानगर बेसबॉल असोसिएशन चे उपाध्यक्ष सुधिर चपळगावकर,छत्रपती पुरस्कार विजेते अक्षय आव्हाड,विरुपाक्ष रेड्डी,कल्पेश भागवत आदिनी विजयी संघाचे अभिनंदन केले आहे. या स्पर्धेचे युट्यूबवर लाईव प्रक्षेपण केले होते. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रशिक्षक डाॅ. प्रा.सुनिल कुटे आणि कोपरगावातील आजी-माजी बेसबॉल खेळाडूंनी अथक परिश्रम घेतले.