आ. आशुतोष काळेंचे सबसे बढीया काम – काका कोयटे

0

कोपरगावच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस

          कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलाव १ ते ४ या चारही साठवण तलावांची ६८ कोटी लिटर असलेली साठवण क्षमता गाळ साचल्यामुळे तीस पस्तीस कोटीवर आली आहे. ज्या पाच नंबर साठवण तलावासाठी आ.आशुतोष काळे आग्रही होते. त्या साठवण तलावाची साठवण क्षमता तब्बल ४० कोटी लिटर आहे. त्यामुळे आ. आशुतोष काळेंनी सबसे बढीया काम केल्याचे कौतुकास्पद गौरवद्गार पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी काढले.

             आ.आशुतोष काळे यांच्या विशेष प्रयत्नातून १३१.२४ कोटी रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या साठवण तलाव क्र. ५ च्या काँक्रिटीकरणाच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.ते म्हणाले की, आजचा दिवस कोपरगावच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा आहे. मागील ५० ते ६० वर्षापासून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न जशाच्या तसाच होता. या पाणी प्रश्नावर पन्नास-साठ वर्षात इतके आंदोलन झालेत की, त्याची मोजदात सुद्धा करता येणार नाही. कोपरगाव मध्ये निघालेल्या घागर मोर्चाने नगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांच्या दारामध्ये जाऊन आम्ही मडके फोडून सगळ्यांना राजीनामे द्यायला लावले असल्याचे त्यांनी सांगितले.

कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न ५ नंबर साठवण तलावामुळे निश्चितपणे सुटणार आहे.कोपरगावकरांना पाणी पाहिजे त्यामुळे कार्यक्रमासाठी सर्वपक्षीय नेते हजर आहेत. आम्ही सर्वांनी ५ नं. साठवण तलावाचे सुरु असलेले काम याची देही, याची डोळा पाहिले आहे. आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेवून केलेले काम अभिनंदनीय असून ज्या दिवशी कोपरगावच्या नळाला येसगावच्या ५ नं. साठवण तलावातून  पाणी येईल तो दिवस देखील कोपरगाव शहराच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहला जाईल.त्या दिवशी कोपरगाव शहरातील सर्व नागरीक दारासमोर सडा, रांगोळी काढून घरावर गुढ्या उभारून तुमचे स्वागत करतील. कोपरगावचे नागरिक, सर्व व्यापारी बांधव यांच्या शुभेच्छा नेहमीच आ.आशुतोष काळे यांच्या पाठीमागे राहणार असल्याचे काका कोयटे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here