सुदाम गाडेकर, जालना :
शेतकरी माय भर उन्हात ,उन्हाचे चटके लागत असताना शेतकऱ्यांच्या न्याय हक्कसाठी शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांचा लाखो शेतकरी किसान सभेच्या मार्च मध्ये सहभागी झाले आहे. पायी चालताना काही शेतकऱ्यांच्या पायाला फोड आले आहे. उन्हाची पर्वा न करता पायी चालत आहे . जगाच्या पोशिंद्याला शिळ्या भाकरी खाऊन आपल्या शेतमालाच्या भावाढीसाठी मोर्चे काढावं लागत आहे. ही खूप मोठी शोकांतिका आहे.
शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही शेत माल कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. आणि सरकार घोषणांचा पोकळ पाऊस पाडत आहे . ठोस निर्णय काहीच नाही . आणि आश्वासने हवेतच आहे. सततची नापिकीमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करत आहेत .आणि सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं लाल वादळ मुंबई च्या दिशेने आगे कूच करत निघालं आहे.
या मार्चमध्ये शेतकरी ,महिला ,पुरुष, आदिवासी, कर्मचारी यांचा मोठा सहभाग घेतला आहे. हा मार्च नाशिकमधून निघालेले लाल वादळ विधानभवनावर धडकणारच असल्याचा ठाम निर्धार किसान सभेने केला आहे. त्यामुळे उद्या लाल वादळ विधानभवनावर आल्यानंतर आता सरकारतर्फे आंदोलनकर्त्यांशी बोलणार कोण असा सवाल आता निर्माण झाला आहे. त्यामुळे आता सरकारसमोर आता नवीन पेच निर्माण झाला आहे.
किसान सभेचा निघालेला लाँग मार्च आता मुंबईत धडकण्याआधी नाशिकच्या पुढे आला आहे. हा लाँग मार्च निघत असला तरी, रस्त्यावर शेतमाल फेकत आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत लाल वादळ आता मुंबईकडे येत आहे. किसान सभेच्या या लाँग मार्चमध्ये आता सरकारच्या अनेक धोरणांचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
या मोर्चामध्ये शेतकरी, आदिवासी, कर्मचाऱ्यांनीही सहभाग नोंदवल्यामुळे या लाँग मार्चला आता सरकार कसं तोंड देणार ते आता उद्याच कळणार आहे. किसान सभेचे अजित नवले , जे. पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला गेला असून यामध्ये आता कष्टकरी, आदिवासी आणि कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे या वर्गाच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही आता मागे हटणार नाही असंही आता स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. नाशिक ते मुंबई पायी लाँगमार्च काढण्यात आला असून कष्टकरी, कर्मचारी, आदिवासी बांधवांकडून सरकारवर आता मोठा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न कष्टकरी वर्गाने केला आहे.
पालकमंत्री दादा भुसे यांनी रविवारी किसान सभेबरोबर संवाद साधून आंदोलन मिठवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला यश आले नाही. त्यामुळे आता उद्या मुंबईत लाल वादळ धडकल्यानंतर सरकारतर्फे किसान सभेबरोबर संवाद कोण साधणार असा सवाल आता केला जात आहे.