उपजिल्हा रुग्णालयामुळे आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम होणार – विरेन बोरावके

0

कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होऊन उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी आ. आशुतोष काळे यांनी निवडून आल्यापासून केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगावला १०० बेडचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे. हे काम सध्या प्रगतीपथावर असून उपजिल्हा रुग्णालयामुळे कोपरगाव मतदार संघाची आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम होणार असल्याचे माजी नगरसेवक विरेन बोरावके यांनी म्हटले आहे.

 

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील लोकसंख्येच्या प्रमाणात कोपरगाव शहरात असलेले ३० बेडचे ग्रामीण रुग्णालय नागरिकांना सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा देण्यात असमर्थ ठरले होते. त्यामुळे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आ. आशुतोष काळे यांनी मतदार संघातील नागरिकांना कोपरगावमध्ये सुसज्ज रुग्णालय उभारणार असे वचन दिले होते. त्या वचनांची पूर्तता करण्यासाठी निवडून आल्यापासून त्यांनी आरोग्य विभागाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होऊन १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला होता.

त्याबाबत पुढील कार्यवाही तातडीने होवून उपजिल्हा रुग्णालयासाठी लवकरात लवकर निधीची तरतूद व्हावी यासाठी त्यांनी  केलेल्या प्रयत्नातून २८.८४ कोटी निधी देखील मंजूर करण्यात येवून काही महिन्यांपूर्वी उपजिल्हा रुग्णालयाचे प्रत्यक्षात काम देखील सुरु झाले आहे. जिल्हा रुग्णालय कोपरगाव मतदार संघापासून जवळपास १०० किलोमीटर दूरवर असून जिल्ह्याच्या उत्तर भागात एकही उपजिल्हा रुग्णालय नसल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांची मोठी गैरसोय होत होती.

आ.आशुतोष काळे यांनी मतदार संघाच्या विकासाबरोबरच आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्याचे अतिशय महत्वपूर्ण काम केले आहे. सुसज्ज उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना सर्व प्रकारच्या आरोग्याच्या सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहे. यामध्ये  तज्ञ डॉक्टर्स, अतिदक्षता विभाग अशा विविध सेवा मिळणार असल्यामुळे अंत्यवस्थ रुग्णांना पुढील उपचारासाठी इतरत्र जाण्याची गरज पडणार नाही. नागरिकांचा आरोग्याचा अत्यंत महत्वाचा प्रश्न आ.आशुतोष काळे यांच्या वचनपुर्तीतून यानिमित्ताने सुटला असून कोपरगाव मतदार संघाची आरोग्यव्यवस्था अधिक सक्षम होणार असल्याचे नगरसेवक विरेन बोरावके यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here