कोपरगाव : दि. २ ऑगस्ट
ऊस उत्पादनवाढीसाठी ठिबक सिंचन फायद्याचा मार्ग शेतकऱ्यांनी कमी खर्चात, कमी पाण्यात अधिकचे उत्पादन कसे मिळेल व खत मात्रा बचतीसाठी ठिबक शेती खात्रीचा मार्ग असून सर्वांनी त्याचा अवलंब करावा असे प्रतिपादन वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट संस्थेचे माजी शास्त्रज्ञ, उसतज्ञ, नेटाफिम कंपनी कृषी विद्या विभागाचे प्रमुख, उपसरव्यवस्थापक अरुण देशमुख यांनी केले.
संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अभ्यासु विवेक कोल्हे यांनी उस उत्पादनांत सातत्याने घट होत असुन त्याच्या वाढीसाठी कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक सभासदांसाठी सर्व गटवार जनजागृती सुरु करून त्याबाबतचे शास्त्रोक्त मार्गदर्शन थेट उपलब्ध करून देत असून मार्गदर्शक मेळाव्यात ते बोलत होते.
प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार प्रास्ताविक केले. उस व्यवस्थापक जी. बी. शिंदे यांनी विविध साखर हंगामात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने केलेल्या उपक्रमाची माहिती दिली, तर उस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर यांनी सभासद शेतकऱ्यांसाठी ऊस लागवडीसाठी असणाऱ्या योजना सांगितल्या.
उसतज्ञ अरुण देशमुख म्हणाले की, शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची नितांत गरज असते. अनियमीत पर्जन्यमान आणि त्यातून पाण्यासाठी सर्वांनाच करावा लागणारा संघर्ष आपण अनुभवलेला आहे. इस्त्रायलच्या शास्त्रज्ञांनी ठिबक सिंचनाचा शोध लावला. पिकांच्या झाडाच्या मुळाशी लहानशा नळीद्वारे पाणी देण्याची आधुनिक पद्धत दिवसेदिवस रूढ होत चालल्याने जगात शेती ठिबकवर आली आहे,. नेटाफिम कंपनीने जगात उच्च दर्जाचे ठिबक संच निर्माण केले असून त्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वापर करावा. उस हे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न देणारे एकमेव पीक असून, कमी पाण्यात अधिकचे उत्पादन घेण्यासाठी आधुनिक तंत्राचा अवलंब करावा. शेतकऱ्यांनी पाणी ठिबकने अन खत गोण्याने असे न करता शास्त्रोक्त माहिती घेऊनच केलेली शेती फायदेशीर ठरत असते. १०० मे.टन उसाचे उत्पादन ठिबकच्या सहाय्याने शक्य आहे. आदर्श पीक लागवड तंत्रज्ञान, माती पाणी तपासणी, अंतर, योग्य सिंचन संच ठिबक ऑटोमेशन, हंगामानुसार उस पिकाला लागणारे पाणी, पीकाची वाढ, जमीनीखालील ठिबक, स्वयंचलीत खत व पाणी व्यवस्थापन, शेतीत डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, उस पिक संरक्षण, बेणे बदल, कारखाना व्यवस्थापन आणि बांधावर उस पिक लागवड तंत्रज्ञान, भविष्यातील शेती व त्यानुरूप ठिबकचा वापर इत्यादी छोटया छोटया बाबींचे सचित्र मार्गदर्शन यावेळी देण्यांत आले. शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करून शेतकी खात्याच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले.
याप्रसंगी उपाध्यक्ष रमेश घोडेराव, संचालक विश्वासराव महाले, त्रंबकराव सरोदे, निलेश देवकर, ज्ञानेश्वर परजणे, निवृत्ती बनकर, रमेश आभाळे, संजय औताडे, ज्ञानदेव औताडे, विलासराव वाबळे, बाळासाहेब पानगव्हाणे, कैलासराव माळी, अरुणराव येवले, मोहनराव वाबळे, बापूसाहेब औताडे, रामनाथ चिने, अशोकराव औताडे, निवृत्ती कोळपे, दगूराव चौधरी, बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहम, चंद्रभान रोहम, व सर्व संचालक, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे आदी उपस्थित होते. उपाध्यक्ष रमेश घोडराव यांनी आभार मानले. ऊसतज्ञ अरुण देशमुख यांचा कारखान्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.
माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांची दूरदृष्टी.
शेतकऱ्यांच्या बांधावर आधुनिक तंत्रज्ञान, नेमकेपणाचे मार्गदर्शन थेट उपलब्ध व्हावे, देश विदेशातील ऊस शेती, जैवतंत्रज्ञान, हवामान बदलाचा शेतीला बसणारा फटका, संभाव्य कीड व त्यावरील उपाययोजना आणि पीक बदल यासाठी माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे या संस्थेचा पाया पन्नास वर्षांपूर्वीच रचला यावरून त्यांच्या विशाल दृष्टिकोनाची आठवण होते., तोच वसा बिपिनदादा कोल्हे व युवा नेते विवेकभैय्या कोल्हे पुढे चालवत असल्याचे अरुण देशमुख म्हणाले.