ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाचा ध्यास गरजेचा – ब्रह्मानंद शंखवाळकर

0

कोपरगाव : ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी सातत्याने खेळाचा ध्यास घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय फुटबॉल पटू,पद्मश्री,  आणि अर्जुन पुरस्कार सन्मानित ब्रह्मानंद शंखवाळकर यांनी केले

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत जागतिक ऑलिम्पिक दिन नुकताच उत्साहाने संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार, पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार सन्मानित ब्रह्मानंद शंखवाळकर  त्यांचे समवेत टोकिओ ऑलिंपिक निरिक्षक अशोक दुधारे, शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित दिलीप घोडके उपस्थित होते.

 या प्रसंगी  ब्रम्हानंद शंखवाळकर म्हणाले की राज्य,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरिल होणाऱ्या  क्रीडा स्पर्धात सहभागी होण्यासाठी भरपुर मेहनत घ्यावी.सातत्याने मैदानाचा ध्यास घेतला पाहीजे तरच विदयार्थी या सहभागी होईल व त्याचा सर्वांगिण विकास होईल. आॕलिम्पिक स्पर्धाची माहीती त्यांनी देवुन ते पुढे म्हणाले की खेळाडुंनी आपल्या आवडत्या खेळात नैपुण्य मिळवावे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांनी केले.

 श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांचे स्थानिक स्कुल कमेटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे ,कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे ,सचिव दीलीप कुमार अजमेरे, सहसचिव श्री.सचिन अजमेरे,संदीप अजमेरे,आनंद ठोळे,डॉ.अमोल अजमेरे,राजेश ठोळे आदीनी जागतिक ऑलिम्पिक दिना निमित्त सर्व खेळाडुंना शुभेच्छा दिल्या.

     या कार्यक्रमांचे सुत्रसंचलन क्रीडा शिक्षक निलेश बडजाते यांनी तर आभार उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड यांनी मानले. या कार्यक्रमाला क्रीडा शिक्षक अनिल काले,अनिल अमृतकर,दीलीप कुडके,अतुल कोताडे,रघुनाथ लकारे,सौ.रेवती तुपकर,सौ.कल्पना महानुभाव,आदी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here