कर्नाटकात भाजपाला धक्का बसण्याचे संकेत ; काँग्रेसला बहुमत मिळण्याचा सी व्होटरचा ओपिनियन पोल

0

बेंगळुरू ; निवडणूक आयोगाने कर्नाटकात विधानसभा निवडणुकांच्या जाहीर करताच वेगवेगळ्या संस्थांचे निवडणूक निकालाचे अंदाज जाहीर झाले . यामध्ये सत्ताधारी भाजपला धक्का बसणार असून काँग्रेस सर्वाधिक जागा जिंकत सत्ता स्थापन करण्याची शक्यता असल्याचे सी व्होटर सर्वेने जाहीर केले आहे. या ओपिनियन पोलनुसार कर्नाटकात काँग्रेसला ११५-१२७ जागा मिळून काँग्रेस पक्ष सत्ता स्थापन करू शकतो तर सत्ताधारी भाजपला ६८-८० जागांवर संधान मानावे लागू शकते. तर जेडीएसला २३-३५ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

कर्नाटकमध्ये राज्यात १० मे रोजी एकाच टप्प्यात निवडणुका होणार असून १३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत. सी-व्होटरने . या ओपिनियन पोलमध्ये २४ हजार ७५९ लोकांची मते घेण्यात आली आहेत. कर्नाटकातील सर्व जागांवर ओपिनियन पोल घेण्यात आला आहे. ओपिनियन पोलमध्ये तीन ते पाच टक्के कमी वा जास्त फरक पडू शकतो. असे म्हटले आहे. या सोबतच मॅटेरिस पोलनुसार कर्नाटकात काँग्रेसला ८८-९८ जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपला ९६-१०६ जागा, जेडीएसला २३-३३ आणि इतरांना २-७ जागा मिळण्याचा अंदाज आहे. लोकमत सर्वेक्षणात काँग्रेसला ११६-१२३ जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपला ७७-८३ जागा, जेडीएसला २१-२७ जागा आणि इतरांना १-४ जागा मिळू शकतात

काँग्रेस सरकार स्थापन करू शकते
पॉप्युलर पोलच्या सर्वेक्षणात काँग्रेसला ८२-८७ जागा मिळताना दिसत आहेत. भाजपला ८२-८७ जागा, जेडीएसला ४२-४५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. कर्नाटकच्या पोल ऑफ पोलमध्ये काँग्रेसला १००-१०८ जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपला ८१-८९ जागा, जेडीएसला २७-३५ जागा आणि इतरांना १-३ जागा मिळू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here