कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथील गारदा नाला परिसरातील अंबिका ग्रुपचे अध्यक्ष सुनील वाघ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या (काळे गट) असंख्य कार्यकर्त्यांनी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात (कोल्हे गट) प्रवेश केला. आज सोमवारी (२३ ऑक्टोबर) हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.
यावेळी बिपीनदादा कोल्हे म्हणाले, माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांनी आदिवासी समाजासह इतर समाजातील गोरगरीब लोकांच्या उन्नतीसाठी आयुष्यभर काम केले. त्यांनी आदिवासी समाजबांधवांना खावटी कर्ज, गायी, मशिनरीचे वाटप केले. पूर्वी झगडे फाटा येथे आदिवासी समाजातील मुला-मुलींसाठी आश्रमशाळा सुरू केलेली होती. तेथे विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचे पाहून आम्ही आदिवासी समाजातील मुला-मुलींसाठी टाकळी येथे नवीन आश्रमशाळा सुरू करून त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. इतर सोयी-सुविधा पुरविल्या. आदिवासी समाजातील मुला-मुलींनी शिक्षण घेऊन प्रगती करावी म्हणून स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांनी त्यांच्यासाठी दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. ग्रामीण भागातील तरुणांना योग्य प्रशिक्षण दिल्यास त्यांना सैन्यदल, पोलिस दलासह इतर क्षेत्रात नोकरीची संधी मिळेल, या विचारातून स्व. कोल्हेसाहेबांनी संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने १९८० च्या दशकात कोपरगाव येथे संजीवनी प्रि कॅडेट ट्रेनिंग सेंटरची स्थापना केली. आजपर्यंत या सेंटरच्या माध्यमातून हजारो युवकांना वेगवेगळ्या क्षेत्रात नोकऱ्या मिळाल्या असून, विशेषतः सैन्यदलात मोठ्या संख्येने तरुण सामील होऊन देशसेवा करत आहेत.
आदिवासी समाजात साक्षरतेचे प्रमाण कमी आहे. समाजाच्या विकासासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आदिवासी समाजातील मुला-मुलींनी शिक्षण घेऊन प्रगती करावी. कोल्हे कुटुंबीय व संजीवनी उद्योग समूहातर्फे त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे व सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव तालुक्यासह मतदारसंघात भारतीय जनता पक्ष वाढीचे कार्य जोमाने सुरू आहे. भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नवीन कार्यकर्ते दाखल होत असून, त्यांना पक्षात सन्मानाची वागणूक दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (काळे गट) मधून भाजप (कोल्हे गट) मध्ये प्रवेश केलेले अंबिका ग्रुपचे अध्यक्ष सुनील वाघ, राजेंद्र जिरे, राजेंद्र सोनवणे, आकाश वाघ, दावल पवार, परसराम गोधे, सुनील माळी, श्रावण जाधव, किरण मोरे, राहुल माळी, मंगेश माळी, प्रकाश वाघ, दीपक गोधे, रवींद्र मोरे, लखन नाईक, विलास मोरे, राहुल आगे, दीपक मोरे, रवींद्र आगे, महेश माळी, आदित्य मोरे, सतीश जिरे, गणेश मोरे, संदीप मोरे, रज्जत सोनवणे, सुनील माळी, संतोष मोरे, संजय गोधे, सागर गोधे, किशोर माळी, तुषार माळी, रामा पवार, नीलेश जिरे, दीपक सोनवणे, मगन मोरे, करण मोरे, सनी मोरे, अनिल म्हस्के, गुरुनाथ मोरे, राजू माळी, विजय माळी, साईनाथ अहिरे, नितीन बर्डे, मारुती अहिरे, दगू जाधव, सूरज वाघ आदी कार्यकर्त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मनेष गाडे, अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, शिंगणापूरचे माजी सरपंच भीमा संवत्सरकर, मनोज इंगळे, मंगेश गायकवाड, सतीश निकम, अतुल सुराळकर आदी उपस्थित होते.