नगर – गोवा येथील मातृभुमी शिक्षण संस्थेच्यावतीने ‘शिवसंस्कार’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व गुजराथ या चार राज्यामध्ये ऑनलाईन ‘राजमाता जिजाऊ वेशभूषा स्पर्धा’ घेण्यात आल्या. या स्पर्धेत नगरच्या कु.युगंधरा अंकुश सुद्रिक (वय 3 वर्षे) हिने सहभागी होत बक्षिस पटकाविले. हा बक्षिस वितरण समारंभ गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते नुकताच पार पडला. यावेळी अभिनेते राज शेखर व मान्यवर उपस्थित होते. यावेळी या स्पर्धेतील सर्वात कमी वयाची विजेती म्हणून कु.युगंधरा हीचे सर्वांनीच कौतुक केले.
कु. युगंधरा ही डॉ.अंकुश सतिशचंद्र सुद्रीक यांची कन्या आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे