के.जे.सोमैया महाविद्यालयामध्ये ‘राष्ट्रीय मतदार दिवस’साजरा

0

कोपरगाव प्रतिनिधी :
राष्ट्रीय सेवा योजना, के.जे.सोमैया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,कोपरगाव व राज्यशास्त्र विभाग यांचे संयुक्त विद्यमाने आज दिनांक 25 जानेवारी रोजी ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ महाविद्यालयामध्ये साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे,तसेच पद्मश्री विखे पाटील महाविद्यालय प्रवारानगर, लोणी या  महाविद्यालयातून उपस्थित झालेले प्रा. डॉ.रणपिसे, प्रा. डॉ.खर्डे उपस्थित होते.

याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणाले की  राज्यघटनेने आपल्याला दिलेला मतदानाचा अधिकार  आपण निर्भीडपणे वापरला पाहिजे तसेच देशाचे भवितव्य घडवण्याचा आणि योग्य नेता निवडण्याचा अधिकार तुम्हाला घटनेने दिलेला आहे. तो योग्य रीतीने वापरण्याचे जबाबदारी आजच्या युवकावरती आहे. त्यासाठी युवकांनी जास्तीत जास्त मतदार यामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत व उज्वल भारतासाठी योग्य नेता निवडीसाठी पुढे यावे असे विद्यार्थ्यांना आवाहन केले.

तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविकात राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. बी. एस. गायकवाड यांनी यशस्वी लोकशाहीसाठी मतदाराचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.एस.एम. देवरे यांनी केले तर प्रा.परिक्षीत जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. आदित्य  देशमुख , कार्यक्रम अधिकारी डॉ.संजय दवंगे, प्रा. डॉ.शैलेंद्र बनसोडे, 57 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. अहमदनगरच्या गर्ल्स बटालियनच्या अधिकारी प्रा. वर्षा आहेर, प्रा.सोळसे   इत्यादींचे सहकार्य मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here