पोहेगांव : कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील कै. भागवत तुकाराम घुले. यांचे प्रथम पुण्यस्मरणा निमित्त श्री राघवेश्वर देवस्थान या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी ह.भ.प.सचिन महाराज पवार यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते यावेळी कीर्तन रुपी सेवेतून महाराजांनी समाज प्रबोधन करून आई-वडिलांची सेवा, समाजाची सेवा, वृक्षरोपण , अन्नदान याचे महत्त्व सांगून अनेक उदाहरणे व दाखले दिले.
यावेळी राघवेश्वर देवस्थानचे महंत राघवेश्वरानंद महाराज, प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री शिवाजीराव घुले यांनी उपस्थितांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली. तसेच वाल्मीक निळकंठ सर यांनी आदर्श जीवन कसे असावे याविषयी माहिती देऊन त्यांना श्री साई राघवेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. विशेष म्हणजे कै. भागवत तुकाराम घुले. अतिशय आधुनिक विचारांचे असल्यामुळे त्यांच्या पश्चात पत्नी त्यांना फक्त दोन मुली व जावई आहेत व त्या दोघींनाही उच्च शिक्षण देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर आटोकाट प्रयत्न केले. गं भा.उषा भागवत घुले पत्नी, सौ सारीका श्रीकांत बुरकुल मुलगी, कु पुनम भागवत घुले मुलगी , श्रीकांत दादा बुरकुल जावई.त्यांच्या या प्रयत्नांना कुंभारी गावचे लोकनियुक्त सरपंच प्रशांत घुले. तसेच श्री साई राघवेश्वर प्रतिष्ठान च्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने व याप्रसंगी उपस्थितांच्या हस्ते श्री राघवेश्वर देवस्थानच्या परिसरात नागपुष्प या वृक्षाची लागवड करण्यात आली. त्याचप्रमाणे वड ,पिंपळ, शमी, बेल, औदुंबर, असे विविध प्रकारचे वृक्ष या परिसरात लावण्यात आले. अशाप्रकारे वृक्षारोपण करून वडिलांचे श्राद्ध घालण्याचा हा महाराष्ट्रात प्रथमच उपक्रम कुंभारी गावात राबविण्यात आला.