कोपरगावकरांनी केला तीन हजार खोटींचा महिषासुर दहन 

0

कोपरगाव : संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित महिषासुर दहन उपक्रमात नागरीकांना  भेडसावणाऱ्या समस्यांना वाचा फोडण्यात आली. तीन हजार खोटी असे नाव देण्यात आले होते.नागरिकांनी जल्लोष करत विवेक कोल्हे व दैवतांची व महापुरुषांची वेशभूषा केलेल्या बाल कलाकारांच्या हस्ते सौ.रेणुकाताई कोल्हे यांच्यासह हजारो कोपरगावकरांच्या उपस्थितीत महिषासुर दहन पार पडले.

महिला सुरक्षा,कायदा सुव्यवस्था,खराब रस्ते,विजेची समस्या,पाणी, बेरोजगारी चा उसळलेला आगडोंब हा बाजारपेठ आणि नागरिकांच्या जीवनावर मोठा परिणाम करतो आहे.नेहमीच आपली संस्कृती जपण्याचे काम संजीवनी युवा प्रतिष्ठान करत आले आहे.गेले अनेक वर्षापासून सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळे, पूरग्रस्तांना मदत,गंगाआरती,दहीहंडी,शिवजयंती उत्सव ,गडकिल्ले स्वच्छता मोहीम असे अनेक सामाजिक जाणीव जपणारे उपक्रम राबविले जातात.एम आय डी सी साठी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमांतून हजारो सह्यांची मोहीम राबवून मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला त्यानंतर यश देखील मिळाले.अलीकडे रोजगार ही सर्वात मोठी समस्या असून त्यावर काम करणे गरजेचे आहे.

रस्त्यांची दुरावस्था,कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा आणि नागरीकांना सुविधांची वानवा झाल्याने प्रचंड रोष नागरीकांना स्थानिक प्रश्नांनी होतो आहे.काही युवकांनी सर्वपित्री अमावस्येला तीन हजार कोटींचे पिंडदान केल्याचे आंदोलन नुकतेच घडले आहे.महिला भगिनींना सर्वात महत्वाचे काही असेल तर सुरक्षा मिळणे आवश्यक आहे.कोपरगावमद्ये कायदा सुव्यवस्था अडचणीत आली असून राजकीय वरदहस्ताने व्यसनाधिनता आणि गुन्हेगारी वाढणे हे नव्या पिढीसाठी धोकादायक आहे.

महिला भगिनी नवरात्री उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतात.संजीवनी बचत गटाने देखील तहसील मैदान येथे घेतलेला उपक्रम चांगला झाला.तुम्ही आमच्या पाठीशी असतात म्हणून आम्ही एवढे काम करू शकतो.सेवा हाच धर्म मानून सामाजिक जाणीव ठेवत काम करण्यासाठी युवा प्रतिष्ठान कटिबध्द आहे आणि पुढेही राहील असे विवेकभैय्या कोल्हे म्हणाले.यावेळी पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक,नागरिक,महिला भगिनी,संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवासेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here