कोपरगाव रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासातून अर्थकारणाला चालना मिळणार – आ. आशुतोष काळे

0

कोळपेवाडी वार्ताहर :- रेल्वे प्रवाशांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी कोपरगाव रेल्वे स्टेशनच्या विविध समस्याबाबत रेल्वे विभागाकडे आजवर केलेल्या पाठपुराव्यातून बहुतांश समस्या सोडविल्या आहेत. अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत २९ कोटी ९४ लक्ष निधीतून कोपरगाव रेल्वे स्थानकाच्या होणाऱ्या पुनर्विकासातून कोपरगाव मतदार संघाच्या अर्थकारणाला चालना मिळणार असल्याचा विश्वास आ. आशुतोष काळे यांनी व्यक्त केला आहे.  

अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत कोपरगाव रेल्वे स्थानकाला पुनर्विकासासाठी देण्यात आलेल्या २९ कोटी ९४ लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या कामाचे भूमिपूजन रविवार (दि.०६) रोजी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते (ऑनलाईन पद्धतीने) पार पडले. यावेळी आ.आशुतोष काळे बोलत होते. ते म्हणाले की, रेल्वे स्टेशनच्या समस्याबाबत केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव रेल्वे स्टेशनवरील लिफ्टचे काम प्रगतीपथावर आहे. एक्स्ट्रा ट्रॅक साठी तीन नंबर प्लॅटफॉर्म ची निर्मितीची केलेली मागणी पूर्ण झाली हे. अंतर्गत रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून स्वच्छतेचा प्रश्न देखील सुटला आहे. नवीन डोम बांधण्यात आले आहेत,गुड्स लाईन वाढवण्यात आली आदी मागण्या पूर्ण झाल्या असून अनेक सोयी सुविधा रेल्वे प्रवाशांना कोपरगाव रेल्वे स्टेशनवर मिळत आहेत त्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये निश्चितपणे समाधानाचे वातावरण आहे. तसेच अमृत भारत स्थानक योजनेत नवीन पादचारी पुलाची मागणी केली होती ती मागणी मान्य करण्यात आली असून नवीन पादचारी पूल करण्यात येणार आहे त्याबद्दल त्यांनी आभार मानले.  

तसेच कोपरगाव रोटेगाव रेल्वे मार्गाचे कोपरगाव पूर्ण झाल्यानंतर कोपरगावला दक्षिण भारत जोडला जाणार आहे.माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रयत्नातून त्यांच्या कार्यकाळात कोपरगाव तालुक्यात विमानतळाची निर्मिती होवून दुष्काळी भागाचा विकास झाला असून मतदार संघाचा अधिकचा विकास साधण्यासाठी  कोपरगाव रोटेगाव  रेल्वे लाईनचा सर्व्हे तातडीने पूर्ण करून या कामाला गती देणे गरजेचे आहे. दक्षिण भारताचे प्रमुख केद्र म्हणून कोपरगाव-रोटेगाव रेल्वे मार्गाकडे पहिले जाते. कोपरगाव-रोटेगाव रेल्वे मार्गामुळे संपूर्ण दक्षिण भारत कोपरगावला जोडला जावून कोपरगाव मतदार संघाचा अधिकचा विकास होणार आहे. याची दखल घेवून या कामाला गती द्यावी. राज्य व परराज्यातून शिर्डी येथे येणारे लाखो भाविक कोपरगाव रेल्वे स्टेशवरुन मोठ्या प्रमाणावर ये-जा करत असल्यामुळे कोपरगाव रेल्वे स्टेशनचा विकास होणे अत्यंत गरजेचे होते. रेल्वे स्टेशनचा विकास झाल्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या नविन संधी उपलब्ध उपलब्ध होवून कोपरगाव शहराच्या वैभवात निश्चितपणे भर पडणार आहे. त्यामुळे केलेल्या पाठपुराव्याची दखल घेवून अमृत भारत स्थानक योजनेत कोपरगाव रेल्वे स्टेशनचा समावेश केल्याबद्दल केंद्र सरकार व राज्य सरकारचे आ. आशुतोष काळे यांनी आभार मानले व कोपरगाव रेल्वे स्टेशनच्या इतरही समस्या मांडून या समस्या देखील रेल्वे विभागाने तातडीने सोडविण्याची मागणी केली.

यावेळी खा. सदाशिव लोखंडे, मा.आ. स्नेहलता कोल्हे, रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता मोहम्मद फैज, स्टेशन प्रबंधक डी.एस.प्रसाद, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य कैलास ठोळे, सुनील कोल्हे, सेवासिंह सहानी, धनंजयज कहार आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक व नागरिक आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here