‘भारत जोडो यात्रा’ रोखण्यासाठी केंद्र सरकार निमित्त शोधत असल्याचा आरोप काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी गुरुवारी केला आहे. चीनसह काही देशांमध्ये कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या रुग्णांची संख्या पाहता केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहून त्यांना यात्रा थांबण्याचे आवाहन केले होते. आपल्या पत्रात ते म्हणाले होते की, जर कोविडचे (Coronavirus) नियम पाळता येत नसतील, तर त्यांनी यात्रा थांबवण्याचा विचार करावा. हरियाणातील नूह जिल्ह्यातील घासेडा गावात एका सभेला संबोधित करताना राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले, “ही यात्रा काश्मीरपर्यंत जाईल. आता त्यांनी नवीन पद्धत आणली आहे. त्यांनी मला पत्र लिहिले की कोविड पसरत आहे, यात्रा थांबवा.” ते म्हणाले, “आता ते यात्रा थांबवण्याचे बहाणे करत आहेत. मास्क घाला, यात्रा थांबवा, कोरोना पसरत आहे, हे सगळे बहाणे आहेत.” केंद्र आणि हरियाणात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षावर निशाणा साधत राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले की, त्यांना सत्याची भीती वाटते.
राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले, “हे लोक भारताची शक्ती, भारताचा खरेपणा याला घाबरले आहेत.” ते म्हणाले की, ‘भारत जोडो यात्रा’ 100 हून अधिक दिवसांपासून सुरू असून पुरुष, महिला आणि लहान मुले यात हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन अशा सर्व धर्मीयांनी सहभाग घेतला. लाखोंच्या संख्येने लोक त्यात सहभागी होत आहे. पण त्यांचा धर्म कोणता, ते कोणती भाषा बोलतात, कुठून आले हे कोणी विचारलेही नाही. राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले की, या 24 तासांच्या प्रवासात लोकांनी एकमेकांचा आदर केला आणि एकमेकांना मिठी मारली आणि प्रेम पसरवलं. दरम्यान, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा राजस्थान टप्प्यानंतर बुधवारी नूह येथून हरियाणात दाखल झाली आहे. कन्याकुमारी येथून 7 सप्टेंबर रोजी सुरू झालेली ही यात्रा आतापर्यंत तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून गेली आहे. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे