कोपरगाव :- दि. ६ मे
तंत्रज्ञानाची झेप मनुष्याला प्रगतीच्या वाटा दाखवितात, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने दैनंदिन कामकाजात संगणकासह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कार्यक्षम वापर केला असुन राज्यातील सर्वच कारखान्यांनी त्याचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अभ्यासु युवा अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतुन संगणकाच्या सहाय्याने लेसपेपर कार्यालयीन कामकाजाचा शुभारंभ साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या हस्ते करण्यांत आला त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे होते.
प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी गाळपासह व्यवस्थापन कामकाजात तसेच जास्तीत जास्त ठिकाणी संगणकाच्या सहाय्याने केल्या जाणा-या कामाची माहिती दिली.
बिपीनदादा कोल्हे अध्यक्षपदावरून बोलतांना म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी आधूनिक तंत्रज्ञानाची दिशा देवुन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखाना यात प्रत्येक बाबतीत सरस कसा राहिल याची शिकवण दिली.
विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, यात पेपरलेस व लेस पेपरची संकल्पना सुरू करण्यामागे सुरूवातीस लेस पेपर म्हणजेच आताचे वापरामध्ये असणा-या पेपरची संख्या ५० टक्के कमी करणे व नंतर पुर्ण कार्यालयीन कामकाज पेपरलेस करणे ही काळाची गरज आहे. साखर कारखानदारीत वेगवान बदल घडत आहेत जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी सर्वांनाच काळानुरूप बदल आत्मसात करावे लागतील.
याप्रसंगी सभासदांना जाणारे संदेश, उसनोंद व त्यांना भ्रमणध्वनीद्वारे उस वजनाची माहिती तसेच उस वाहनांचे संगणकप्रणालीच्या माध्यमातुन डिझेल वितरण व त्याची वाहन मालकांना तात्काळ माहिती, त्याचप्रमाणे सर्व संचालक मंडळीय कामकाज इतर उप समित्यांचे इतिवृत्तांतासह अन्य कामकाजाची माहितीही दिली जाते.
शेखर गायकवाड पुढे म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञान ही काळाची गरज आहे. सध्याच्या स्पर्धेत आसपास घडणा-या बदलांचा वेध सर्वानीच घेतला पाहिजे त्यातुलनेत आपल्या कारखान्याचा सभासद, शेतकरी व त्यावर अवलंबुन असणारे घटक मागे राहता कामा नये म्हणून राज्यातील सर्वच कारखानदारांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याप्रमाणे पेपरलेस संकल्पना अंमलात आणावी.
याप्रसंगी उपाध्यक्ष रमेश घोडेराव, संचालक सर्वश्री. विश्वासराव महाले, ज्ञानेश्वर परजणे, बापूसाहेब बारहाते, निलेश देवकर, बाळासाहेब वक्ते, ज्ञानदेव औताडे, रमेश आभाळे, राजेंद्र कोळपे, विलासराव वाबळे, मनेष गाडे, विलासराव माळी, त्रंबकराव सरोदे, सौ. उषाताई संजय औताडे, सौ. सोनियाताई बाळासाहेब पानगव्हाणे, निवृत्ती बनकर, सतिष आव्हाड यांच्यासह अहमदनगर, नाशिक व संभाजीनगर जिल्हयातील सर्व सहकारी व खाजगी कारखान्यांचे कार्यकारी संचालक उपस्थित होते. शेवटी उपाध्यक्ष रमेश घोडेराव यांनी आभार मानले. साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, मनुष्यबळ विकास अधिकारी प्रदिप गुरव, सचिव तुळशीराम कानवडे व त्यांच्या सर्व सहका-यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमांस संजीवनी उद्योग समुहातील विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद शेतकरी, सर्व खाते प्रमुख, उपखातेप्रमुख, विभागप्रमुख मोठया संख्येने उपस्थित होते. उपाध्यक्ष रमेश घोडेराव यांनी आभार मानले.