प्रत्येकांच्या योगदानातून गावाचा विकास होण्यास वेळ लागणार नाही- बाबासाहेब धिवर
नगर – कौडगाव जांब येथे यात्रा उत्सवनिमित्त ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब धिवर यांच्या विनंतीला मान देऊन कांडके केमिस्ट्री अॅकॅ डमीचे विजय कांडके यांनी गावाला बसण्याचे बाकडे भेट दिले. याप्रसंगी बाबासाहेब धिवर, सोसायटी चेअरमन गोरख कांडके, योगेश पेरणे, भिवसेन धीवर, दिलीप कांडके, दादा कोंडके, संतोष धीवर, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
कांडके केमिस्ट्री अॅकेडमीच्यावतीने देण्यात आलेले 10 बाकडे स्माशनभुमी, बौध्द वस्ती, शेख वस्ती कब्रास्तान, बायपास बाजारस्थळ, गावाच्या दर्शनी भाग आदि ठिकाणी बसविण्यात आले. त्यामुळे नागरिकांची मोठी सोय झाल्याचे समाधान ग्रामस्थांनी व्यक्त केले.
गोरख कांडके म्हणाले, ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब धिवर यांच्या बदल हा कार्यकर्ता कसलेही राजकारण न करता कसलाही दुजाभाव न करता गावाचा, समाज हिताचा वसा जोपासणारा नि:स्वार्थी कार्यकर्ता आहे. गावाच्या विकासासाठी अशा तरुणांची गरज आहे, असे कौतुकास्पद उद्गार काढले.
यावेळी बाबासाहेब धिवर म्हणाले की, गावाच्या विकासासाठी आपण कोणत्याही राजकारण न करता विकासाला प्राधान्य दिले आहे. गावाचा सर्वांगिण विकास व्हावा, यासाठी गावाच्या गरजा ओळखून त्यादृष्टीने काम सुरु आहे. कांडके सरांच्या आजच्या मदतीने आम्हास काम करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. गावाच्या विकास कामात योगदान देऊ इच्छिणार्यांना मो. 9850446203 वर संपर्क साधावा, असे आवाहन केले.