नगर- क्रिएटर्स डान्स अकॅडमी अँड ड्रेपरी व झुम्बा फिटनेस च्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी उन्हाळी शिबिर आयोजित करण्यात आले होते. मागील पहिल्या समर कॅम्पला उस्फुर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या विनंतीवरून समर कॅम्प दि. १ मे ते १५ मे २०२३ रोजी सुरू होत आहे. यामध्ये डान्स, ड्रॉईंग, मॉडेलिंग, आर्ट अँड क्राफ्ट, ट्रीप, माईंड गेम्स अशा ऍक्टिव्हिटी चे प्रशिक्षण देण्यात येणार आहेत.
रोज स.१० ते दु.१ वाजेपर्यंत अशा वेळेत दिनांक १ मे ते १५ मे दरम्यान हे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर पार पडेल. सर्व शिबिरातील सहभागी विद्यार्थ्यांना अकॅडमी वतीने प्रमाणपत्र देण्यात येणार असून, तरी जास्तीत जास्त पालकांनी व विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होऊन याचा उस्फूर्तपणे फायदा घ्यावा, असे आहवान क्रिएटर्स अकॅडमीचे संचालक दिनेश फिरके यांनी केले आहे.
हा समर कॅम्प दिल्लीगेट येथे क्रिएटर्स डान्स अकॅडमी, दीक्षित मंगल कार्यालयाशेजारी, हिमालया टॉवर येथे होणार असून अधिक माहितीसाठी 81499 99149 या क्रमांकावर संपर्क साधावा. प्रवेश मर्यादित असल्याने लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करावा.