कोपरगाव : येथील खुले नाट्यगृहाच्या कामाबाबत समाधान कारक कारवाई न झाल्यास प्रजासत्ताक दिनी अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचे आंदोलन होणारच असे लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की गेल्या एक वर्षांपूर्वी लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने नगर पालिकेला निवेदन देऊन खुले नाट्यगृहाच्या कामाच्या ठेकेदाराकडून काम काढून घ्यावे म्हणून पत्र दिले होते. मात्र काहीच कारवाई न झाल्याने दि १७ जाने २०२३ रोजी पुन्हा निवेदन देऊन नाट्यगृहाचे काम त्वरित सुरू न केल्यास प्रजासत्ताक दिनी अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा देण्यात आला. त्यास नगर पालिका मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी खुलासा देऊन सदर कामाचा कार्यरंभ आदेश दि ११/६/२०२१ रोजी दिला असून सदर काम एक वर्षाच्या आत पूर्ण करण्याचे निविदेत जाहीर केले होते. मात्र नगर पालिकेने दि १८/१०/२०२२ रोजी संबधीत ठेकेदाराला काम सुरू करण्याचे पत्र दिले होते. तसेच दि १३/१/२०२३ रोजी ठेकेदारास अंतिम नोटीस दिल्याचे तसेच काम सुरू न केल्यास अनामत रक्कम जप्त करणार असल्याचे व नवीन जिल्हा दर सूची करून नवीन निविदा प्रक्रिया करणार असल्याचे नमूद केले आहे.
सदर ठेकेदाराने आता पर्यंत किती काम केले? त्यावर किती पेमेंट दिले? ठेकेदाराने आता पर्यंत सदर नाट्य गृहाचे जुनी फरशी व सामान काढले असून त्याची कुठे विल्हेवाट लावली ? दोन वर्षांपूर्वी त्या वेळच्या जिल्हा दर सूची प्रशासकीय मान्यता यासाठी झालेला खर्च व पुन्हा एकदा नवीन कामा करिता व नवीन निविदा प्रक्रिये साठी वेळ व नगर पालिकेला होणाऱ्या आर्थिक भुर्दंड याची जबाबदारी कोणावर टाकणार या प्रश्नांची समाधान कारक उत्तरे मिळाली नाही तर अधिकाऱ्यांच्या तोंडाला प्रजासत्ताक दिनी काळे फासण्याचे आंदोलन होणारच असे या प्रसिद्धी पत्रकात संतोष गंगवाल, प्रवीण शिंदे, तुषार विध्वंस,निसार शेख, योगेश गंगवाल आदींनी म्हटले आहे.