गुणवत्तापूर्ण शिक्षण हे सह्याद्री संस्थेचे वैशिष्ट्य – आ. बाळासाहेब थोरात

0

संगमनेर : सहकार व ग्रामीण विकासातून राज्यात आक्रमणांकित ठरलेल्या संगमनेर तालुक्याची शैक्षणिक सुविधा ही  राज्यात गौरवली जात आहे. संगमनेर हे सुविधायुक्त मोठे शैक्षणिक केंद्र बनले असून गुणवत्ता हे वैशिष्ट्य सह्याद्री शिक्षण संस्थेने जपले असल्याचे गौरवोउद्गार माजी शिक्षणमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले.

           येथील भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयात लोकनेते बाळासाहेब थोरात व अटल लॅबचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी  माजी आ.डॉ. सुधीर तांबे ,संचालक तुळशीराम भोर, सिताराम वर्पे ,रजिस्टार आचार्य बाबुराव गवांदे सह सेक्रेटरी दत्तात्रय चासकर,प्राचार्य प्रा.मच्छिंद्र दिघे, एस.एम खेमनर यांचेसह सर्व शिक्षक उपस्थित होते. यावेळी आ.थोरात व माजी आ.डॉ तांबे यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या उपकरणांची माहिती घेतली.
             याप्रसंगी बोलताना लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की ,शिक्षण हे समाजाच्या प्रगतीचे सर्वात महत्त्वाचे माध्यम आहे. संगमनेर मध्ये सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्या असुुन उच्च गुणवत्तेचे शिक्षण येथे मिळत असल्याने संगमनेर हे मोठे शैक्षणिक केंद्र झाले आहे.सह्याद्री शिक्षण संस्थेने आपली गुणवत्ता जपताना सातत्याने विविध उपक्रम राबवले आहेत.या विद्यालयाचे अनेक विद्यार्थी राज्य पातळीवर चमकले असून या संस्थेचे विविध माजी विद्यार्थी मोठ्या पदांवर कार्यरत आहेत.शिक्षणाबरोबर संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी विज्ञान विभागाच्या वतीने काम होत असून आगामी काळात हाच लौकिक जपताना या संस्थेतील अनेक विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर करिअरच्या नवीन संधी मिळतील असा  विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
         माजी.आ डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, गुणवत्तेला पर्याय नाही. संगमनेर मध्ये चांगल्या गुणवत्तेचे शिक्षण मिळत असल्याने महाराष्ट्रातून अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येत आहेत. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री संस्थेत आधुनिक शिक्षणाच्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मिलिंद आवटी, तुषार गायकर , वीरेश नवले यांच्यासह विविध शिक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here