ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काळे गटाची बाजी ; २७ पैकी तब्बल १६,तर कोल्हे गटाचे ९ सरपंच विजयी

0

कोपरगाव ; कोपरगाव तालुक्यासह विधानसभा मतदार संघातील २६ + १ = २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आज लागला . यात तालुक्यातील २६ पैकी १५ ग्रामपंचायतींवर काळे गटाचे सरपंच जनतेतून निवडून आले . तर ९ ठिकाणी कोल्हे गटाचे सरपंच निवडून आले . त्याचप्रमाणे ठाकरे गट शिवसेनेने एक ग्रामपंचायत ताब्यात घेण्यात यश मिळवले. एक ग्रामपंचातीवर अपक्ष महिला सरपंचाने विजय मिळविला. तसेच कोपरगाव विधानसभेत असलेल्या मात्र राहाता तालुक्यातील एकमेव ग्रामपंचायत नथू पाटलाची वाडी या ग्रामपंचायतीवर काळे गटाने विजय मिळविला . अत्यंत चुरशीच्या वातावरणात शनिवारी मतदान किरकोळ अपवाद वगळता शांततेत पार पडले होते. काळे आणि कोल्हे गटाने सर्व ताकदीनिशी निवडणूक लढल्यामुळे निकालाची उत्सुकता वाढली होती . त्याचप्रमाणे राज्यातील सरकार बदली नंतर पुन्हा एकदा जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे हा बदललेला निर्णय कोणाच्या पथ्यावर पडणार याचीही उत्सुकता वाढली होती. सकाळी ९. ३० वाजता मतमोजणी शिंगणापूर सारख्या मोठ्या ग्रामपंचायतीच्या मतमोजणी पासून सुरवात करण्यात आली होती. आणि अपेक्षेप्रमाणे येथे कोल्हे गटाने आपले सरपंच पदाच्या आणि सदस्य निवडीतही बाजी मारत आपले खाते उघडले होते . त्यानंतर मात्र काळे गटाने जोरदार मुसंडी मारत पंधरा ग्रामपंचायतींवर आपला झेंडा रोवला. मतदारसंघातील राहाता तालुक्यातील नपावाडी अशा एकूण २७ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली आहे. यापैकी माहेगाव देशमुख, कोळपेवाडी, शहापूर, वडगाव, भोजडे, हंडेवाडी, चासनळी, रांजणगाव देशमुख, मोर्वीस, पढेगाव, डाऊच बु., चांदेकसारे, बक्तरपूर, सडे, बहादरपूर व मतदार संघातील राहाता तालुक्यातील नपावाडी येथे काळे गटाने सत्ता मिळविली तर , धारणगाव, देर्डे कोऱ्हाळे, सोनेवाडी, तळेगाव मळे, शिंगणापूर, खिर्डी गणेश, बहादराबाद,खोपडी, करंजी बु., या ग्रामपंचातीवर कोल्हे गटाचे सरपंच निवडून आले .

गड आला पण सिंह गेला ! वरील म्हणीचा प्रत्येय अनेक ग्रामपंचायतीमध्ये आला आहे . अनेक ठिकाणी बहुमत कोल्हे गटाचे तर सरपंच मात्र काळे गटाचे निवडून आले तर बहुमत काळे गटाचे तर सरपंच मात्र कोल्हे गटाचा उमेदवार निवडून आले आहेत . त्यामुळे बहुमताचा गड जिंकूनही सरपंचपदाचा उमेदवार पडल्याने आनंदावर विरजण पडल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे गावच्या विकासावर नक्कीच परिणाम होणार आहे. कारण बऱ्याचदा सरपंचाने घेतलेले निर्णय विरोधी गट बहुमताच्या जोरावर हणून पडतो तर बहुमताने घेतलेल्या निर्णयाला लोकमुक्त सरपंच खोड घालत असल्याचे मागील पाच वर्षांमध्ये आढळून आले होते.

निवडणूक अधिकारी तहसीलदारांचे भोंगळ नियोजन अवघ्या २६ ग्रामपंचायतीची मतमोजणी असताना तहसीलदार विजय बोरुडे यांनी लोकसभेच्या निकालाप्रमाणे तयारी केली असल्याचा अविर्भाव दाखविला होता. मात्र प्रत्यक्षात मतमोजणीची आकडेवारी सुद्धा वेळेत बाहेर उपस्थित जनतेला कळत नव्हती. धवनीक्षेपक कधी बंद तर कधी चालू, अचानक वीज गेली तर पर्यायी सोय काहीच नाही ऐन वेळेला जनरेटर आणला तर त्यात पेट्रोलचा पत्ता नाही . मतमोजणी कक्षामध्ये कोणालाही ओळखपत्राशिवाय प्रवेश नाही सांगण्यात आला होता . अगदी पत्रकारांनाही प्रवेश नाकारण्यात आला होता . फक्त अधिस्वकृतीधारक पत्रकारच असल्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा फतवा त्यासाठी पुढे करण्यात आला . मोबाईल नेण्यास मनाई असताना आतमध्ये चोरून काहींनी मोबाईल नेल्याचे दिसत होते. मतमोजणीच्या ठिकाणी अवघे दोन पत्रकार असल्याचे लक्षात येताच . उपरती झाल्याप्रमाणे पत्रकारांना वर बोलावण्यात आले . त्यातही एका स्थानिक वृत्त वाहिनीच्या पत्रकारास अक्षरशः गेट आऊटची अपमानास्पद भाषा तहसीलदारांनी वापरली

कोपरगाव तालुका ग्रामपंचायत निवडणूक निकाल,,,,आणि सदस्य बलाबल पुढील प्रमाणे १)शिंगणापूर -कोल्हे गट (भाजप) – १४,काळे गट (राष्ट्रवादी – ०३,सरपंच– डॉ विजय काळे कोल्हे गट भाजप

२)खिर्डीगणेश– कोल्हे गट (भाजप) – ०८,काळे गट (राष्ट्रवादी – ००,परजणे – १ सरपंच– चंद्रकांत चांदर, कोल्हे (भाजप)

३)भोजडे– कोल्हे गट (भाजप) – ००,काळे गट (राष्ट्रवादी) – ०९सरपंच -सुधाकर वादे,, काळे गट (राष्ट्रवादी)

४)सडे– कोल्हे गट (भाजप) – ०२,काळे गट (राष्ट्रवादी – ०५ सरपंच -आशाबाई बारहाते,काळे गट (राष्ट्रवादी)
५)कोळपेवाडी– कोल्हे गट (भाजप) – ०४,काळे गट (राष्ट्रवादी – ०९ सरपंच – चंद्रकला सूर्यभान कोळपे,, काळे गट (राष्ट्रवादी)

६)शहापूर– कोल्हे गट (भाजप) – ०४,काळे गट (राष्ट्रवादी – ०३ सरपंच– योगिता घारे,काळे गट (राष्ट्रवादी)

७)वेस सोयगाव-कोल्हे गट (भाजप) – ०२,काळे गट (राष्ट्रवादी – ०५,अपक्ष. – ०२ सरपंच अपक्ष – जया प्रकाश माळी

८)माहेगाव देशमुख– कोल्हे गट (भाजप) -०१,काळे गट (राष्ट्रवादी -१० सरपंच– सुमन ज्ञानदेव रोकडे,काळे गट (राष्ट्रवादी)

९)वडगाव-काळे परजणे युती -०६, कोल्हे – ०१ सरपंच – संदिप सांगळे,, काळे गट

१०)चांदेकसारे-कोल्हे गट(भाजप)-०२, काळे गट(राष्ट्रवादी – ११ सरपंच – किरण विश्वनाथ होन,काळे गट (राष्ट्रवादी)

११)पढेगाव-कोल्हे गट (भाजप) – ०६,काळे गट (राष्ट्रवादी – ०३सरपंच – मीना बाबासाहेब शिंदे,काळे गट (राष्ट्रवादी)

१२)डाऊच खुर्द– कोल्हे गट (भाजप) – ००,काळे गट (राष्ट्रवादी – ०२,परजणे – १,शिवसेना – ६ सरपंच – स्नेहा संजय गुरसळ शिवसेना गट (ठाकरे)

१३)मोर्विस– कोल्हे गट (भाजप) – ०२,काळे गट (राष्ट्रवादी – ०५ सरपंच – सविता जनार्दन पारखे ,काळे गट (राष्ट्रवादी)

१४)बहादरपुर– कोल्हे गट (भाजप)-०६,काळे गट (राष्ट्रवादी) -०३सरपंच – गोपीनाथ पाराजी रहाणे, काळे गट (राष्ट्रवादी)

१५)देर्डे-कोऱ्हाळे– कोल्हे गट (भाजप) – ०४, काळे गट (राष्ट्रवादी – ०५ सरपंच – नंदा दळवी ,कोल्हे गट (भाजप)

१६)हंडेवाडी– कोल्हे गट (भाजप)-०६, काळे गट (राष्ट्रवादी – ०१,सरपंच – निवृत्ती सोपान घुमरे काळे, गट (राष्ट्रवादी)

१७)डाउच बुद्रुक– कोल्हे गट (भाजप)-०६,काळे गट (राष्ट्रवादी -०१ सरपंच – दिनेश रघुनाथ गायकवाड,काळे गट (राष्ट्रवादी)

१८)खोपडी– कोल्हे गट (भाजप) – ०३ काळे गट (राष्ट्रवादी – ०४सरपंच – विठाबाई वारकर कोल्हे गट (भाजप)

१९)बहादराबाद– कोल्हे गट (भाजप) -०६,काळे गट (राष्ट्रवादी – ०१ सरपंच- अश्विनी पाचोरे, कोल्हे गट (भाजप)

२०) सोनेवाडी-कोल्हे गट परजणे (भाजप) – १०,काळे गट (राष्ट्रवादी – ०३सरपंच – शकुंतला गुडघे, कोल्हे गट (भाजप)

२१)चासनळी– कोल्हे गट (भाजप) – १०,काळे गट (राष्ट्रवादी – ०३ सरपंच – सूनिता बनसोडे काळे गट (राष्टवाडी) २२)बक्तरपुर– कोल्हे गट (भाजप) – ०२,काळे गट (राष्ट्रवादी – ०५सरपंच – मुक्ताबाई नागरे काळे गट (राष्ट्रवादी)

२३) तळेगाव मळे– कोल्हे गट (भाजप) – ०६, काळे गट (राष्ट्रवादी – ०३ सरपंच – आरती टुपके कोल्हे गट (भाजप)

२४) रांजणगाव देशमुख– काळे कोल्हे गट – १०, कोल्हे गट – ०१ सरपंच – जिजाबाई गजानन मते काळे गट (राष्ट्रवादी)

२५) धारणगाव कोल्हे गट (भाजप) – ०९ काळे गट (राष्ट्रवादी – ०२ सरपंच – वरुणा दीपक चौधरी कोल्हे गट

२६)करंजी कोल्हे ६, काळे ५ सरपंच– रवि आगवन, कोल्हे गट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here