ग्रामसभेत जागेची एक मुखाने मंजुरी
कोपरगाव (वार्ताहर) : कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे पंचक्रोशीमध्ये सध्या पोहेगाव सब स्टेशन वर विद्युत वितरणाचा भार असून यावर अतिशय लोड असल्यामुळे या परिसरात विद्युत रोहित्रांना देखील वीज पुरवठा सुरळीत होत नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींनी चांदेकसारे सब स्टेशन साठी मंत्रालयातून मंजुरी आणली आणि ते मंजूर झाले मात्र जागे अभावी ते दोन वर्षापासून प्रलंबित असल्याने जागेची शोधा शोध सुरू होती. सोनेवाडी डाऊच खुर्द आधी परिसरात यासंदर्भात जागेची पाहणी झाली होती मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे तेथेही हे सब स्टेशन घेण्यास विद्युत वितरण कंपनीने असमर्था दर्शवली होती. मात्र चांदेकसारे येथील 321/1 सर्वे नंबर मध्ये असलेल्या शासकीय गावठाणातील जागेमध्ये हे सबस्टेशन घेण्यास चांदकसारे ग्रामपंचायतीकडून विद्युत वितरण कंपनीला सुचवण्यात आले होते. जागेची पाहणी केल्यानंतर त्यांनीही या सबस्टेशनसाठी तयारी दर्शवली होती. अखेर काल सर्वाहुमते ग्रामसभेमध्ये सबस्टेशनच्या जागेला मंजुरी देत हा प्रश्न निकाली काढला आहे. सरपंच किरण होन अध्यक्ष खाली काल विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उपसरपंच सचिन होन, काळे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आनंदराव चव्हाण, संचालक शंकरराव चव्हाण, रोहिदास होन, डॉ गोरक्षनाथ रोकडे, पोलीस पाटील मिराताई रोकडे, कल्याण होन,भिमाजी होन, दिलीप होन, नारायण होन, अर्जुन होन,वसिम शेख, धीरज बोरावके, दगू अंकल, राजू शेख, पंकज होन ,शरद होन, गणेश होन, अशोक होन, रवींद्र खरात मलू होन, अर्जुन बोरावके, ओंकार आहेर, सचिन होन ग्रामविकास अधिकारी किरण राठोड अदी उपस्थित होते.आमचा गाव आमचा विकास या 15 वित्त आयोगातून विकास आराखडा 2023 /24 तयार करण्यात आला. आरोग्य उपकेंद्र, मुस्लिम दफन भूमी, मागास स्मशानभूमी, रस्ते ,पाणी आधी विषयावर चर्चा करत निधी कसा वापरायचा हे ठरवण्यात आले.गावातील विकासाबरोबर वाड्या वस्त्या वरील विकासासाठी देखील ग्रामपंचायतीने सहकार्य करावे असे मत शरद होन यांनी मांडले तर भैरवनाथ पालखी मार्गाचा रस्त्यावर झालेले अतिक्रम सामंजसने काढण्यासाठी ग्रामपंचायतीने पाठपुरावा करावा यासाठी आनंदराव चव्हाण व रोहीदास होन यांनी सांगितले तर ऐडंकी येथील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या रस्त्याची देखील कामाची जबाबदारी ग्रामपंचायतने घ्यावी असे सचिन होन सुचवले. बाकीच्या सर्व कामाच्या बाबतीत ग्रामपंचायतीने निर्णय घ्यावा मात्र विद्युत वितरण कंपनीचे सब स्टेशन तातडीने मार्गी कसे लागेल याकडे लक्ष द्यावे अशी मागणी शंकराव चव्हाण यांनी केले.गावच्या विकासासाठी सर्वांनी सहकार्य करावे ग्रामपंचायतच्या पातळीवर सर्व कामे मार्गी लावू असे सांगत सरपंच किरण होन यांनी आभार मानले.