चित्रकला आणि फोटोग्राफी स्पर्धा कल्पनाशक्ती विकसित करण्याचे व्यासपीठ -प्राचार्य डॉ. माधव सरोदे

0

( एस.एस.जी.एम महाविद्यालयात रंगतरंग स्पर्धांचे आयोजन)
कोपरगाव प्रतिनिधी :-“मुलांचा सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यातील कला जोपासली पाहिजे, कलेच्या माध्यमातूनच त्यांच्या कल्पनाशक्तीचा विकास होऊ शकतो, हा
विचार केंद्रभूत ठेवून महाविद्यालयात दिनांक १४ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी या कालावधीमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आज ‘चित्रकला व फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथे सांस्कृतिक विभाग आयोजित ‘रंगतरंग स्पर्धांच्या’उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ. माधव सरोदे बोलत होते.

त्यांनी आपल्या मनोगतामध्ये, “विद्यार्थ्यांना व्यक्त होण्यासाठी चित्रकला हे अतिशय प्रभावी माध्यम असल्याचे याप्रसंगी सांगितले. चित्रकला स्पर्धा ही विद्यार्थ्यांना चौकटी बाहेर विचार करण्यास त्यांच्या सर्जनशील क्षमतेचा शोध घेण्यास आणि अद्वितीय कल्पना आणि संकल्पना मांडण्यात प्रोत्साहित करते. तसेच फोटोग्राफी या क्षेत्रामध्ये प्रोफेशनल फोटोग्राफी, पत्रकारिता, वाईल्ड फोटोग्राफी यांसारख्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना खूप संधी असून त्या क्षेत्रामध्ये त्यांनी करिअर करावे असेही सांगितले.
याप्रसंगी चित्रकला व फोटोग्राफी स्पर्धेचे परीक्षक संतोष तांदळे म्हणाले की, “कला शाखा ही विद्यार्थ्यांच्या कौशल्याला वाव देते. कलेमुळे समाजाचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. तसेच कलेमुळे विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक अंगी वृत्ती वाढीस लागते. चित्रकला स्पर्धेत ७१ व फोटोग्राफी स्पर्धेत१६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात अनुक्रमे चित्रकला स्पर्धेत कु.धुळे वैष्णवी राजेंद्र हिने प्रथम, चि. महाले मंगेश याने द्वितीय, सवई साक्षी हिने तृतीय कु. पवार पल्लवी बाबुराव हिने उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला.
फोटोग्राफी स्पर्धेत चि.शिंदे सुमित याने प्रथम, कु. लोखंडे श्रावणी हिने द्वितीय, चि.भन्साळी ओम याने तृतीय तर कु.योगिता कुऱ्हे हिने उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला.

यावेळी सदर कार्यक्रमासाठी विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ.मोहन सांगळे, कलाशाखेचे उपप्राचार्य डॉ.बाबासाहेब शेंडगे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. अर्जुन भागवत,महोत्सवाचे कार्याध्यक्ष प्रा.अरुण देशमुख , प्रा.डॉ. उज्ज्वला भोर, डॉ.बंडेराव तऱ्हाळ, चित्रकला व फोटोग्राफी स्पर्धेचे समन्वयक डॉ. योगेश दाणे व सर्व समिती सदस्य यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. सीमा दाभाडे यांनी केले. तर आभार प्रा डॉ. अर्जुन भागवत
यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here