समाजहितवादी पाच सत्कार मुर्ती पुरस्काराने सन्मानीत, जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष नासीर पठाण यांना संविधान गौरव पुरस्कार प्रधान
जामखेड तालुका प्रतिनिधी – जामखेड तालुक्यात २६ जानेवारी हा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असतानाच तमाम भिम प्रेमीच्या वतीने गेल्या दहा वर्षांची परंपरा जोपासत साजरा करण्यात येणारा संवीधान महोत्सव गतवर्षी हा मोठया उत्साहात साजरा करत विविध क्षेत्रातील समाजहितवादी काम करणाऱ्या पाच मान्यवरांचा माजी मंत्री तथा आमदार राम शिंदे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
सर्व भिम प्रेमीच्या वतीने संपुर्ण शहरातुन निळे ध्वज लाऊन रॅली काढण्यात आली होती रॅलीनंतर बाजार तळातील आंबेडकर भवन समोर साजन बेद्रे व विशाल चव्हाण या स्टार गायकांचा संगीत गाणे जलसा घेण्यात आला तसेच याच कार्यक्रमादरम्यान सालाबाद प्रमाणे याही वर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या मान्यवर सन्मानीत पाच व्यक्तीचा पुरस्कार देऊन माजी मंत्री तथा विद्यमान विधान परिषदेचे आ. राम शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यात वैदकीय क्षेत्रातुन डॉ फारूक आजम, सामाजीक क्षेत्रातुन अमित गंभीर, शैक्षणीक क्षेत्रातुन मुकुंद राऊत, समता क्षेत्रातुन पंडित मोरे, तर पत्रकार क्षेत्रातुन जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष नासीर पठाण यांचा सन्मान करण्यात आला
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्या शहराला व जामखेड तालुक्याला प्रेरीत व्हावा म्हणून पुर्णाकृती पुतळ्यासाठी माझे योगदान राहील तसेच कर्जत जामखेडसाठी बौध्द विहार व्हावे यासाठी पाच कोटीचा निधी वर्ग केला असून आचारसंहिता संपल्या नंतर पुढील कार्यवाही होईल अशी घोषणा आ. राम शिंदे यांनी प्रजासत्ताकदिनी गुरवारी संविधान महोत्सव कार्यक्रमात केली.
जामखेड शहरातील बाजारतळावर भिमसैनिकांनी गुरवारी प्रजासत्ताक दिन व संविधान दिनानिमित्त संविधान महोत्सव आयोजित केला होता. यावेळी आ. प्रा. राम शिंदे बोलत होते. यावेळी आ. शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास व भारतीय संविधानाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. संविधान महोत्सव निमित्ताने यावेळी प्रबोधनकार साजन बेंद्रे व विशाल चव्हाण यांची मैफिल अयोजीत केली होती. तसेच खर्डा चौकात संविधान दिन साजरा करण्यात आला
यावेळी बोलताना प्रा. राम शिंदे म्हणाले, मागील दहा वर्षांपासून प्रजासत्ताक दिनी संविधान महोत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते संविधान महोत्सव अयोजीत करतात. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली त्यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाची घटना लिहिली. प्रजेची सत्ता ज्यांच्यामुळे आली त्यांच्या नावाचा गुणगौरव म्हणजे संविधान महोत्सव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार या संविधान महोत्सवात आपणा सर्वांना प्रेरीत व प्रोत्साहीत करणारा कार्यक्रम घेत असते तसेच या कार्यक्रमात समाजाप्रती चांगले काम करणारे, अडचणीत मदतीचा हात देणारे शैक्षणिक, सामाजिक, पत्रकारिता यामध्ये काम करणा-यांचा गौरव केला जातो यामुळे या संविधान समितीचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे असे गौरवोद्गार आ. राम शिंदे यांनी काढले.
या कार्यकमासाठी आयोजक विकी सदाफुले सह सर्व मित्र परिवार भिमकन्या सुरेखा सदाफुले सर्व भिमसैनीक भिमकन्या माता पिता बंधु तसेच ल ना . होशिंग विद्यालयाचे प् माजी प्राचार्य अनंता खेत्रे ; प्राचार्य श्रीकांत होशिंग ; नगरसेवक अमित चिंतामणी सर्व क्षेत्रातील मान्यवर पत्रकार अशोक निमोणकर, यासीन शेख, रियाज शेख, धनंजय पवार सह ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते यावेळी माजी मंत्री राम शिंदे यांनी सर्व उपस्थित भिम प्रेमीना संवीधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या