प्रथम बक्षीस महारूद्र हुंबे यांना प्लसर मोटारसायकल
जामखेड तालुका प्रतिनिधी – जामखेड शहरात बजाज फायनान्स व मोबाईल इलेक्ट्रॉनिक, टायर्स, दुकानदाराच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे होणाऱ्या भव्य लकी ड्रॉ ची सोडत केशर हॉल या ठिकाणी बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या वेळी जामखेड, आष्टी, पाटोदा खर्डा येथील दुकानदारांचे एकुण एकवीस बॉक्स होते प्रत्येकी एका बॉक्स मधुन जाहेद व अर्णव या दोन लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली. शेवटची चिठ्ठी सर्व बॉक्स खाली ओतुन एकत्र चिठ्ठी टाकल्या .
त्यातुन प्रथम बक्षीस महारूद्र हुंबे यांना प्लसर एन. एस. मोटारसायकल, दुसरे बक्षीस दत्तात्रय बांगे यांना एसी, तिसरे बक्षीस कृष्णा सुरवसे यांना एलइडी टिव्ही, चौथे बक्षीस संतोष माळी यांना फ्रिज, पाचवे बक्षीस धिरज जाधव यांना मोबाईल, सहावे बक्षीस चंदन बाबासाहेब यांना अटा गिरण, सातवे बक्षीस बाबासाहेब फुलमाळी यांना पाण्याचे फिल्टर, आठवे बक्षीस विराज पाटील यांना गॅस शिगडी, नववे बक्षीस मारूती गिते यांना होम थेटर, दहावे बक्षीस राहुल पवार यांना कुलर, आकारावे बक्षीस राहुल यवले यांना सायकल, बारावे बक्षीस शकील मुलाणी यांना ब्लुटुथ स्पिकर, तेरावे बक्षीस चंद्रसेन डोळे यांना इलेक्ट्रॉनिक शिगडी, चौदावे बक्षीस विकास ढवळे यांना मिक्सर, पंधरावे बक्षीस युवराज जाधव यांना टेबल फॅन, सोळावे बक्षीस अनिल कांबळे यांना स्मार्ट वॉच, सतरावे बक्षीस दादा तोडकर यांना की पॅड फोन , अठरावे बक्षीस विकास गवळी यांना पावर बँक, एकोणीसावे बक्षीस अशोक तोडकर यांना एअर बड्स, वीसावे बक्षीस संतोष खंडागळे यांनी इस्त्री, एकवीसावे बक्षीस झुंबर माने यांना डिनर सेट देऊन या सर्व विजेतांचे सन्मान करून बक्षीस देण्यात आले
जामखेड शहरात सर्वात जास्त बजाज फाईल्स केल्या बद्दल आष्टेकर मोबाईलचे सागर आष्टेकर, श्रेया मोबाईलचे अरुण लटके, क्रॉससेल. मोबाईल पॉईंट चे जुनेद बागवान, पाटोदाचे अजिज मोबाईल शॉपचे अजिज शेख, न्यु महेंद्रा मोबाईल शॉपचे राज माने, आष्टी साई मोबाईलचे बाळु रेडेकर, खर्डाचे ओम साई मोबाईल शॉपचे संदीप वडे या सर्वाचे बजाज फायनान्स यांच्या कडुन सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले.
बजाज फायनान्सचे मॅनेजर निखिल नरोडे, स्वप्नील लोंढे, बजाज फायनान्स एरिया मॅनेजर समीर गिरी यांच्या सह नागरिक विजेते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर गिरी यांनी केले तर आभार निखील नरवडे यांनी मानले