मुस्लिम बांधवांनी हिंदू – मुस्लिम बांधवांना आषाढी एकादशी व बकरी ईद च्या दिल्या शुभेच्छा
जामखेड तालुका प्रतिनिधी :
जामखेड शहरामध्ये(बकरीद ईद)ईद-उल अजहा व आषाढी एकादशी हे दोन्ही सण उत्साहात साजरे करण्यात आले.. मक्का मस्जिद येथे जामखेड शहरातील मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज अदा केली. यावेळी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी सर्व मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या व तसेच वसीम कुरेशी ( बिल्डर) यांनी आषाढी एकादशी व बकरी ईद च्या सर्व हिंदू मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या
यावेळी वसिम बिल्डर व सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले, नगरसेवक अर्शद शेख, उमर कुरेशी,जाकीर शेख ,व बी. ग्रुप चे कार्यकर्ते उपस्थित होते..
वसीम कुरेशी बोलताना म्हणाले की जामखेड शहर व तालुक्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहीले पाहीजे यासाठी पोलीस प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य होते यापुढेही सहकार्य राहील लवकरच शहरात जातीय सलोखा व राष्ट्रीय एकात्मेचा मोठ्या स्वरुपात कार्यक्रम घेऊन स्तुत्य उपक्रम राबविण्यात येणार असून हिंदु-मुस्लिम-दलित हम सब एक है चा नारा अबाधित राहील हाच माझा एकवचनी निर्धार होता व राहील
यावेळी सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले,जाकीर शेख यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे आभार उमर कुरेशी यांनी मानले