जामखेड शहर सह तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरी  

0

पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी तालुक्यात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला .                          

जामखेड तालुका प्रतिनिधी  — रमजान महिना हा मुस्लीम बांधवांचा पवित्र महिना असतो . या महिन्यात सर्व मुस्लीम बांधव एक महिन्याचे निरंकार उपवास (रोजा ) करतात . आज सांगता म्हणुन जामखेड तालुक्यातील नान्नज, खर्डा, जवळा, पाटोदा, हळगाव, पिंपरखेड येथे ईदगाह मैदानावर सर्व मुस्लीम बांधव एकत्र येऊन रमजान महिन्याच्या सण उत्साहात साजरा करण्यात आला. उपवासानंतर दि. २२ रोजी रमजान ईद त्यादिवशी सकाळी ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केली रमजान ईद सणामुळे १ महिनाभर चालू असलेल्या उपवासाची (रोजे) सांगता झाली. प्रेम, शांतता व बंधुभाव ही सणाची प्रमुख शिकवण होय. एक महिन्याच्या कडक उपवासाची सांगता म्हणून रमजान ईद दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. त्याप्रमाणे या दिवशी ईदगाह मैदानावर ज्येष्ठ धर्मगुरू मौलाना अफजल कासमी यांनी उपस्थितांना नमाज पाठविला. यावेळी मैदानाच्या बाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. होता. तहसीलदार योगेश चंद्रे यांनीही यावेळी भेट दिली.

    ईदगाह मैदानावर नमाज पठण झाल्यावर ईदगाह मैदानावर प्रा मधुकर राळेभात  ;नगरसेवक अमित चिंतामणी ; बिभिषण धनवडे ; अॅड. अरुण जाधव ; मोहन पवार ; डॉ.भास्कर मोरे ;राहुल उगले, अमित जाधव ; प्रा . लक्ष्मण ढेपे ; आदी हिंदु बांधवांनी मुस्लीम बांधवांना अलिगन देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या . तर रमजान ईद व अक्षय तृतीय हे सण गेल्या ५१ वर्षानंतर एकत्र आल्याने मुस्लीम बांधवांनी हिंदु बांधवांना अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा दिल्या . त्यामुळे ईदगाह मैदानावर राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडले . सणाच्या पहिल्या दिवशी दि. २१  एप्रिल रोजी कापड दुकानात ग्राहकांची गर्दी झाली रात्री ईदच्या खरेदीसाठी मेनरोड गर्दीने फुलुन गेला होता. .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here