जामखेड सौताडा महामार्गाच्या ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी तहसीलदारांना निवेदन

0

मयत महादेव काळे यांच्या कुटुंबीयांचा उपोषणाचा इशारा 

जामखेड तालुका प्रतिनिधी – मागील आठवड्यात जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाच्या चुकीमुळे गाडी डिव्हायडरवर धडकून गाडीने पेट घेतल्याने महादेव काळे व पोलीस कॉ. धनंजय गुडवाल यांचा मृत्यू झाला होता. ठेकेदाराच्या चुकीमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत. तर अनेकांना अपंगत्व आलेले आहे. सदर ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा लवकरच आम्ही  कुटुंबीयांसह उपोषण करणार असल्याचा इशारा मयत महादेव काळे यांच्या पत्नी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे

This image has an empty alt attribute; its file name is IMG-20250222-WA0003-1-1.jpg

निवेदनात म्हटले आहे की, जामखेड कडे मारुती सुझुकी ईरटिगा वाहन एम एच १६- डिएम-५८९३ या चार चाकी वाहनामध्ये येत असताना ठेकेदार च्या चुकी मुळे अपघात होवुन माझे पती व त्यांचे बरोबर असणारे जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस कॉ. धनंजय नरेश गुडवाल  यांचा मृत्यु झालेला आहे. सदरचा अपघात हा कावेरी हॉटेल, बीड रोड जवळ अर्धवट व चुकीच्या ठिकाणी बांधकाम केलेल्या डिव्हाइडरला धडकुन सदरचा भिषण अपघात झालेला आहे. सदरचा अपघात इतका भीषण होता की, सदरचे वाहन जळून त्यामधील माझे पती महादेव काळे व त्यांचे सहकारी मित्र गुडवाल हे पूर्ण जिवंत जळून त्यांचा कोळसा झालेला होता

सदरचा अपघात हा केवळ सदरचे अर्धवट बांधकाम केलेल्या डिव्हाइडर जवळ कुठेही बॅरीगेटींग केलेले नव्हते, रेडियम लावलेले नव्हते, सूचना फलक लावलेले नव्हते, तसेच सदरच्या डिव्हाइडरला धडकून अपघात होवू  नये म्हणुन आवश्यक त्या गोष्टींची काळजी ठेकेदार ने घेतलेली नव्हती त्यामुळे सदरचा अपघात हा फक्त ठेकेदार कंपनीच्या निष्काळजी पणामुळे होवुन माझे पतीचा मृत्यु होवुन माझे पतीवर अवलंबुन असणारे माझी मुलगी कु. रुद्राणी वय – ०९ वर्ष, माझा मुलगा ऋग्वेद वय ७ वयस्कर सासु  मिना, माझे दिर अतुल असे सर्व कुटुंब उघडयावर पडलेलो आहोत. आमचे घरातील कर्ता माणुस गेलेला आहे. आम्ही अनाथ झालेलो आहोत.

जर या ठेकेदार कंपनीने  रोडचे काम करताना पाळावयाचे  नियम जर पाळले असते तर हा अपघातच झाला नसता. केवळ या ठेकेदार कंपनीच्या हालगर्जी पणामुळे कामात केलेल्या दिरंगाई मुळे मुदत संपून देखील काम पूर्ण झालेले नाही. केवळ ठेकेदाराच्या चुकी मुळे अनेक लोकांना त्या रस्त्यावर अपघात होवुन प्राण गमवावा लागलेला आहे. अनेक जाणांना अपघातुन अपंगत्व आलेले आहे. त्या रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्डया मुळे  अनेक गरोदर महिलेचे रस्त्यावरून प्रवास करताना गर्भपात झालेले आहेत. बरेच लोकांचे मणके खिळखिळे  झालेले आहेत. श्वसनाचे आजार झालेले आहेत. सदरच्या ठेकेदारां विरुध्द बरेच जणांनी यापूर्वी तक्रारी केलेल्या असताना पण प्रशासनाने दुर्लक्ष करून ठेकेदाराला पाठीशी घातलेले आहे

त्यामुळे माझे पतीचा झालेला अपघात धनेश्वर ठेकेदार कंपनीच्या चुकी मुळे झाला असल्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून माझे मयत पतीला व माझे  कुटुंबीयांना न्याय मिळवून दयावा अन्यथा सदरचा गुन्हा दाखल न केलेस मी व माझे लहान मुले व कुटुंबीयांसह जामखेड तहसिल कार्यालया समोर आमरण उपोषण करणार आहोत. निवेदनावर मधुमाला महादेव काळे, अतुल काळे, अँड अरूण जाधव, प्रा. मधुकर राळेभात, अँड हर्षल डोके, पवन राळेभात, अमित जाधव, अशोक पोटफोडे, राजू शिंदे, बापू ओव्हळ, सागर घोडके, संतोष मगर, सुनील साळवे, अनिल जावळे, राजेंद्र राऊत, सचिन हारणे यांच्या सह अनेकांच्या निवेदनावर सह्या आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here