जिद्द चिकाटीमुळे डॉ राहुल गुडघे यांनी डी एम कार्डिओलॉजी परीक्षेत यश मिळवले : मा आ स्नेहलताताई कोल्हे 

0

माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते गौरव 

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील भूमीमध्ये अनेक हिरे दडलेले आहे. सोनेवाडी गाव त्यात कुठेच मागे नाही. सरळ ,साधी ,ज्ञानी व गुणी कष्टकरी व संयमी माणसं येथे आहेत. या शेतकरी गुडघे कुटुंबातील डॉक्टर राहुल दत्तात्रय गुडघे यांनी 

डी एम कार्डिओलॉजी परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले. जिद्द चिकाटी व प्रचंड महत्वकांक्षा या दडलेली होती. स्वर्गीय शंकरराव कोल्हे हे नेहमी सांगायचे की शेतकरी कष्टकरी कुटुंबातील व्यक्ती उच्च पदावर गेली पाहिजे. देश प्रदेशात या मुलांनी नाव केले पाहिजे. संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेची स्थापना करून अनेकांना उच्च शिक्षणाची दारे खुले करून दिली. त्यामुळेच आज डॉक्टर राहुल गुडघे सारखे होतकरू मुले आपल्या कोपरगाव तालुक्याचे नाव उंचावत आहे. असे प्रतिपादन कोपरगाव विधानसभेच्या माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी केले.nत्या संगमनेर येथे डॉ. राहुल गुडघे यांच्या गौरव सोहळ्यामध्ये बोलत होत्या.

माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते डॉ. गुडघे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन डॉक्टर राहुल गुडघे यांनी खूप मोठी उंची गाठली आहे. कितीही मोठया स्कूलमध्ये शिक्षण घेतले मात्र आपल्यामध्ये कर्तव्य सिध्द करण्याची क्षमता नसली तर त्याचा उपयोग होत नाही. मात्र हल्ली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच रयत शिक्षण संस्थेतील विद्यार्थी आपले करिअर घडवण्यात यशस्वी ठरत आहे. डॉक्टर राहुल गुडघे यांनी बारावी नंतर पंधरा वर्षे सातत्याने कष्ट केले. त्यामुळे त्यांना हे यश मिळाले

मिळवलेले यश हे देशाकरता अभिमानास्पद आहे असे त्यांनी सांगितले.यावेळी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, रयत शिक्षण संस्थेच्या मीनाताई जगधने, सौ कांचनताई थोरात, सौ दुर्गाताई तांबे, आमदार सत्यजित तांबे, जयश्रीताई थोरात, ललिताताई दिघे, दत्तात्रेय गुडघे, सरपंच शकुंतला गुडघे, ज्ञानदेव औताडे, निरंजन गुडघे, ॲड जयंत जोशी, शिवाजी दिघे , सुलभाताई दिघे,संजय दिघे ,अभिजीत दिघे ,सुजय दिघे ,विलास दिघे, कृष्णा दिघेअदी उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना डॉक्टर गुडघे यांनी सांगितले की कितीही मोठे यश मिळवले तरी माझी मातीशी नाळ जुडलेली आहे मी जमिनीवरच राहणार.अभिमान अहंकार होऊन देणार नाही. हृदयरोगाबरोबरच बालपणात असलेल्या मुलांच्या छातीचे छिद्र यावर देखील उपचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक श्रीमती ललिता दिघे यांनी केले तर आभार कृष्णा दिघे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here