अहिल्यानगर : जिल्ह्यातील मतदारांनी मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील मतदारांचे अभिनंदन केले आहे आणि त्यांना धन्यवादही दिले आहेत. लोकशाहीच्या या उत्सवात मतदारांचा सहभाग कौतुकास्पद आहे. लोकशाही बळकट करून जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेला गती देण्यासाठी हा सहभाग महत्वाचा ठरेल असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनातर्फे आयोजित विविध उपक्रमात सहभागी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, पोलीस, शिक्षण आणि शासनाचे विविध विभाग, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांचे सहकारी, विविध विभागांचे अधिकारी, माध्यम प्रतिनिधी, कर्मचारी, सामाजिक – शैक्षणिक संस्था, नागरिक यांना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी धन्यवाद दिले आहेत. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून जिल्ह्याने ७२.७४ टक्के मतदान शक्य झाले असे सालीमठ यांनी म्हटले आहे.