नगर – भारत शिक्षण मंत्रालय राष्ट्रीय परिक्षा प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जी पॅट 2023 या परिक्षेत वसंत टेकडी येथील डॉ.ना.ज.पाउलबुधे कॉलेज ऑफ फार्मसीमधील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यामध्ये पल्लवी शेळके, सुशांत नागरगोजे, साहिल नेटके, प्राजक्ता जाधव, तुषार गिते, सारिका मधे, प्रिया चोथे, अजय पावरा, वरुण पाटणी, ओंकार वाघ, सुवर्णा हजारे या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. या सर्व विद्यार्थ्यांना कॉलेजचे सचिन जाधव, डॉ.राजेंद्र पाटील यांच्यासह शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष विनय पाउलबुधे, विश्वस्त रामभाऊ बुचकुल, सौ.नम्रता जगधने, रामकिसन देशमुख, दादासाहेब भोईटे, साई पाउलबुधे, रघुनाथ कारमपुरी, बी.एड्. कॉलेजच्या प्राचार्या डॉ.रेखाराणी खुराणा, बी.फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.निलेश जाधव, डि.फार्मसी कॉलेजच्या प्राचार्या अनुराधा चव्हाण, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.