डाऊच खुर्द शाळेत इयत्ता 5 वी च्या विद्यार्थ्यांना निरोप.

0

कोपरगाव (वार्ताहर) कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा डाऊच खुर्द येथे इयत्ता 5 वी च्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  चंद्रकांत बाजीराव गुरसळ होते.

इ. 1 ली मध्ये प्रवेश कधी होतो आणि बघता बघता 5 वी त कधी जातो कळत नाही. या 5 वर्षात खूप काही शिकायला मिळाले. आधी आई वडील यांना न सोडू वाटणारी मुले कधी शिक्षकाच्या सानिध्यात जाऊन दिवसभर शाळेत रममाण होऊन जातात. आहे त्यांनाच ठाऊक नाही. विद्यार्थी भाषण करतांना रडत होती. हे पाहून शिक्षकांच्या सुद्धा डोळ्यात पाणी आले. अनेक गमतीदार अनुभव या चिमुकल्या नी सांगितले.तसेच बदली झालेले शिक्षक जाधव धनराज सर यांनी सुद्धा आपले भावनिक विचार मांडले. ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक थोरात अशोक सारंगधर (मुख्याध्यापक) यांनी केले. या कार्यक्रमाला संदीप ठोंबरे. हिरालाल त्रिभुवन. बापू गुरसळ. संतोष पुंगळ. सौ. सुमन पवार. शनिश्वर गुरसळ. उपस्थित होते.आभार श्रीमती. बनसोडे मनिषा यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here