डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्या एका धर्माचे नव्हे तर सर्व भारतीय नागरिकाचे – सपोनि विजय झंजाड 

0

जामखेड तालुका प्रतिनिधी :- ग्रामीण विकास केंद्र संचालित भटके विमुक्त संसाधन केंद्र खर्डा येथे प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थिती मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पाडली. या कार्यक्रमासाठी उपस्थित खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड होते या वेळी झंजाड बोलताना म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जगाच्या पातळीवर चालणारे विचार असून त्यांचे कार्य महान आहे. करोडो लोकांचे उध्दारकर्ते आहेत. 

तसेच डॉ. बीपीनचंद्र लाड म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांचे विचार जो मनात रुजवेल तो शिक्षणात पुढे जाईल. तसेच कार्यक्रमाच्या प्रास्ताविक मध्ये विशाल पवार म्हणाले की सर्व महापुरुषांचे विचार एकच होते म्हणूनच भारतीय संविधान तयार करण्यासाठी सोपे गेले. महापुरुष आणि संतांचा एकच वैचारिक विचार आहे. या कार्यक्रमाची प्रस्ताविका निशा शिंगाने यांनी केली . कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून खर्डा  पोलीस स्टेशनचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड , पोलीस हे. कॉ.शशिकांत म्हस्के उपस्थित होते तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ.लाड , भिमराव सुरवसे, संविधान प्रचारक निता इंगळे, दिपाली काळे, मंगल शिंगाणे, निशा शिंगाने, उल्फा लोंढे, सुरेश पवार, शोभा ठोकळे, शरद ठोकळे, दीपा काळे, अनुसया पवार, सुरज पवार, रुकसाना मापाडी, उर्मिला कवडे, रेश्मा शेख यांच्या सह महिला आदी मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here