डोकेनगर मधील शाळेच्या पक्के संरक्षण भिंतीचे कामास स्थगिती देण्याबाबत हर्षदा पार्क रहिवासीयांचे मनपाला निवेदन

0

अहमदनगर – अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील सावेडी उपनगरमधील डोकेनगर येथील शाळेच्या पक्के  संरक्षण भिंतीचे कामास स्थगिती मिळावी याबाबतचे निवेदन अहमदनगर महानगर पालिका  आयुक्त यांना हर्षदा पार्क येथील रहिवासीयांनी दिले. यावेळी बाबासाहेब काळे, राजू बेळगे, एन.एस.पैठणकर, दिलीप पवार, शरद राऊत, एस.व्ही.कुलकर्णी, सतीश लगड, श्रीधर ढाकणे, विकास घोडके आदिंसह रहिवासी उपस्थित होते. मनपा आयुक्तांच्यावतीने अतिक्रमण विभागाचे बल्लाळ यांनी हे निवेदन स्विकारले.

     मनपाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सावेडी गाव अंतर्गत सर्व्हेक्र.59 अंतर्गत डोकेनगर – हर्षदा पार्क, निर्मलनगर मध्ये येतो. जिल्हाधिकारी यांच्याकडून अनिवासी भाग म्हणून जाहीर झालेला आहे. येथील प्लॉट लेआऊट मंजूर असून, हर्षदा पार्कचा 6 मीटर रस्ता आहे.

     या भागातील शाळेने रस्त्यावरच संरक्षक भिंतीचे पक्के बांधकाम सुरु करण्याच्या हालचाली  केल्या आहेत.  यावर परिसरातील नागरिकांनी आक्षेप घेऊन रहदारीचा रस्ता मंजूर लेआऊट प्रमाणे सहा मीटर ठेवून मग तुम्ही संरक्षक भिंतीचे काम करुन घ्यावे, असे सांगितले. तरी मनपाच्या अतिक्रमण विभागाने प्रत्यक्ष पाहणी करुन कामास स्थागिती द्यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.

     शाळेच्या पाठीमागे नागरी वसाहत आहे. तेथे आम्ही वास्तव्यास आहे. शाळेचे शौचालय व प्रसाधनगृह असल्याने त्याची दुर्गधी पसरते. ते इतरत्र हलवावे व आम्हाला न्याय मिळवून द्यावा, असे निवेदनात म्हटले आहे.

     या निवेदनावर वरील नागरिकांसह मंगल औटी, राजेश म्हसे, म्हातारदेव ठोंबरे, सौ.विजयमाला हसनाळे, आण्णासाहेब तुपे, सुनिल उकिरडे, सौ.चंद्रकला वर्पे, अविनाश गीते, अशोक बडे, गोंविद इंगळे, संदिप पोटे यांच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here