नगर – अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या तबला विशारद पूर्ण परिक्षेत कु.जान्हवी सुनिल खिस्ती प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली, असून नाशिक केंद्र क्र.10 मध्ये प्रथम आली आहे.
कु.जान्हवी हीस विश्वासराव जाधव यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. ती खिस्ती हेल्थ क्लबचे संचालक शशिकांत व स्नेहा खिस्ती यांची पुतणी तर सुनिल व स्मिता खिस्ती यांची कन्या आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.