आंदोलन ऊर्जा उपसचिवांशी चर्चेनंतर स्थगित
नगर- तांत्रिक कामगार युनियनच्यावतीने प्रलंबित असलेल्या प्रश्न व मागण्याकरिता आझाद मैदान मुंबई येथे 2 जुलै 2024 पासून बेमुदत धरणे आंदोलन पुकारले होते. आंदोलनाची दखल घेत आज शासनातर्फे ऊर्जा उपसचिव बडगिरे व केंद्रीय पदाधिकारी शिष्टमंडळ यांचे समवेत सकारात्मक चर्चा झाली. या चर्चानुसार तांत्रिक कामगार युनियन 5059 चे सुरू असलेले आंदोलन तूर्त स्थगित करण्यात येत असल्याची माहिती तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय सरचिटणीस प्रभाकर लहाने यांनी दिली.
या आंदोलनामध्ये तांत्रिक कामगार युयिनयनचे केंद्रीय अध्यक्ष दिलीप कोरडे, उपाध्यक्ष बी.आर. पवार, सतिश भुजबळ( नगर) गोपाल गाडगे, सरचिटणीस प्रभाकर लहाने, उपसरचिटणीस नितीन चव्हाण, शिवाजी शिवणेचारी, संजय उगले, राज्य संघटक महेश हिवराळे, आर. आर.ठाकुर, राज्य सचिव आनंद जगताप, रघुनाथ लाड( नगर) प्रकाश निकम, कोषाध्यक्ष गजानन अघम, मुख्य कार्यालय प्रतिनीधी पारेषण विक्रम चव्हाण, दत्तु भोईर (नगर), किरण कन्हाळे, प्रकाश वाघ, तांत्रिक टाईम्स संपादक सुनिल सोनवणे, उपसंपादक विवेक बोरकर, प्रसिध्दी प्रमुख अनिल सरोद( नगर)विक्की कावळे यांच्या सह अहमदनगर मधील शंकर जाडकर, विक्रम कोके, बाळासाहेब जावळे, सचिन सुडके,शरद काकडे, शेकडो तांत्रिक कामगार उपस्थित होते. प्रश्न सुटे पर्यंत अविरत आंदोलना चा निर्धार पदाधिकार्यांनी व्यक्त केला होता.
तांत्रिक कामगारांच्या मागण्या व प्रश्ना बाबत महावितरण प्रशासन उदासिन असल्याने प्रशासना प्रति तांत्रिक कामगारांनी दि. 24 ऑगष्ट 2022 रोजी आझाद मैदान, मुंबई येथे व दि. 22 डिसेंबर 2022 रोजी विधानभवनावर, नागपुर येथे मोठ्या संख्येने आकोश व्यक्त केला आहे. तसेच मुख्य कार्यालय, प्रकाशगड येथे ठिय्या आंदोलनाची नोटीस सुध्दा देण्यात आली होती. तरी सुध्दा दिलेल्या आश्वासनानुसार प्रशासन कामगारांचे प्रश्न सोडवित नसल्याने तांत्रिक कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
यापूर्वी आंदोलनाच्या पाश्वभुमिवर मा. संचालक मानव संसाधन यांच्या समवेत सविस्तर चर्चा करण्यात आली होती, चर्चेमध्ये संघटनेने सादर केलेल सर्व प्रश्न हे योग्य असल्याचे मानव संसाधन संचालक यांनी मान्य केले. तसेच सदरहु प्रश्न तातडीने कार्यवाही करण्याच्या सुचना देणार असल्याचे कळविले होते तसेच प्रलंबित प्रश्न सोडविण्याबाबत प्रशासनाने लेखी आश्वासन दिले होते. परंतु कंपनी प्रशासनाकडून महत्वाचे प्रलंबित व ज्वलंत प्रश्नाबाबत कार्यवाही अपेक्षीत असतांना धोरणात्मक निर्णय असल्याचे लेखी कळविले जाते. संघटनेला व कामगारांना हे अपेक्षित नाही. व्यवस्थापनाचे धोरण हे कामगार व ग्राहकांना न्याय देणारे असावेत. अन्यायकारक व कामगार विरोधी व्यवस्थापनाचे धोरण असल्याने तांत्रिक कामगारांचा रोष वाढत आहे. दिलेले आश्वासन त्वरीत पुर्ण करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केले होती.