ते फक्त निवडणुका आल्यावर रोजगार मेळावे घेवून वेळ मारून नेतात : – आ. आशुतोष काळे

0

कोपरगाव : आपण पाच वर्षात केलेला विकास जनतेसमोर आहे दुर्दैव एवढेच आहे की, मोजक्याच लोकांना तो दिसत नाही ते आपल्या कार्यकर्त्यांना विचारतात तुमच्या गावात निधी आला का? विकास कामे झाली हे कार्यकर्त्यांना पण माहित आहे पण कार्यकर्ते त्यांच्यापुढे संकोच करीत असले तरी विरोधकांचा हा बालिशपणा आहे. जर २३२ कोटी निधी देर्डे फाटा-भरवस फाटा या रस्त्याला आणला. हा निधी धामोरी, चास, वेळापूर, शहाजापूर, देर्डे यापैकी कोणत्या गावाच्या हिशोबात धरायचा. तसेच ७५२ जी या राष्ट्रीय महामार्गाच्या सावळीविहीर-कोपरगाव रस्त्याला १९१ कोटी निधी आणला हा निधी कोकमठाण, जेऊर कुंभारी, कोपरगाव कोणाच्या हिशोबात धरायचा असा प्रति प्रश्न करून आ.आशुतोष काळे यांनी आपले राजकीय विरोधक विवेक कोल्हे यांचे नाव न घेता टीका केली .

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या २०२४/२५  या वर्षाच्या ७० व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ कारखान्याचे मार्गदर्शक व जेष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली व चेअरमन आ. आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हा.चेअरमन शंकरराव चव्हाण व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.शंकुतला चव्हाण यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा करून करण्यात आला याप्रसंगी आ. आशुतोष काळे बोलत होते.

आमदार काळे पुढे म्हणाले की सकाळी बारा वाजता उठायचे आणि ऑफिसमध्ये बसून प्रेसनोट काढणाऱ्यांना कसा विकास दिसणार. जे निवडणुका आल्या की मगच घराबाहेर पडतात. रोजगार मेळावे घेवून वेळ मारून नेतात.परंतु जनता आता सुज्ञ झाली असून जनता त्यांच्या गप्पांना आता भुलणार नाही. आपण विकासाबरोबरच शासनाच्या सर्व योजना सर्व समान्य जनतेपर्यंत पोहोचविल्या आहेत त्यामुळे जनता समाधानी आहे. तुम्ही मात्र बेसावध राहू नका आपण गळीत हंगामही यशस्वी करू आणि येणारी निवडणूकही जिंकू असा आत्मविश्वास आमदार काळे यांनी यावेळी व्यक्त केला .

यावेळी ऊस उत्पादक शेतकरी व कामगार यांना अग्रस्थानी ठेवून २०२३-२४ ला गळीतास आलेल्या ऊसाला अंतिम भाव रु.१२५/- प्र.मे.टन प्रमाणे देण्याचा जाहीर करून सोमवार (दि.१४) रोजी दिवाळीपूर्वीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पेमेंट जमा करण्यात येणार आहे. जो न्याय ऊस उत्पादक सभासद, शेतकऱ्यांना दिला तोच न्यायकर्मचाऱ्यांना देतांना २० टक्के बोनस देण्याचे आ. आशुतोष काळे यांनी जाहीर करून ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचारी यांची दिवाळी गोड केली असून साखर कामगारांच्या वेतन वाढीसंदर्भात त्रिपक्षीय समितीचा जो निर्णय येईल त्याची तात्काळ अंमलबजावणी करू अशी ग्वाही दिली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here