सातारा/अनिल वीर : जिल्हा वंचित बहुजन युवा आघाडीतर्फे दहिवडी व सातारा येथे पोलिसांना निवेदन देऊन मुंबई येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा शोध घेऊन त्या पदाधिकाऱ्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करावी. अन्यथा, आंदोलनाचा छेडण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे, मुंबई या ठिकाणी आंबेडकर भवन दादर परिसरात वंचित बहुजन युवा आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष परमेश्वर रणशूर व वार्ड अध्यक्ष गौतम हराळ यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याचा राज्यभर निषेध होत आहे.तेव्हा हल्लेखोरांना ताबडतोब अटक करून या हल्ल्यामागचा मास्टर माईंड जगदीश गायकवाड व त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी.अशा मागणीचे निवेदन वंचित बहुजन युवा आघाडी साताऱ्याच्यावतीने सहायक पोलीस निरीक्षक, दहिवडी यांना जिल्हाध्यक्ष सनी तुपे,माण तालुकाध्यक्ष युवराज भोसले, शहराध्यक्ष राजू आवटे व अंकुश नामदास यांनी दिले. याशिवाय, सातारा येथे पो. निरीक्षक घोडके यांना जिल्हा महासचिव कु.सायली भोसले व वंचितच्या जिल्हा उपाध्यक्षा चित्रा गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन सुपूर्द केले.