सामाजिक कार्यकर्त्या बेबीताई गायकवाड यांना पितृशोक
नगर – शेवगांव तालुक्यातील दहिगावने येथील प्रगतशिल शेतकरी देवराव बारकू काळे यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. मृत्यू समयी ते 82 वर्षांचे होते. त्यांच्यावर काळेवस्ती येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी पंचक्रोशितील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्व.देवराव क़ाळे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सहा मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. शेतीला जोडधंदा म्हणून जगदंबा उद्योग समुहाची उभारणी केली. त्यांच्या निधनाने पंचक्रोशितून हळहळ व्यक्त होत आहे. बँक ऑफ बडोदाचे निवृत्त अधिकारी एम.बी. काळे भाऊ तर जगदंबा उद्योग समुहाचे देवीदास, ज्ञानेश्वर काळे यांचे ते चुलते होत.