नवराञ उत्सवाचे फ्लेक्स फाडल्याने भाविकांमध्ये तीव्र संताप
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी :
देवळाली प्रवरा शहरातील बाजारतळ व सोसायटी चौकात माजी खा.सदाशिव लोखंडे व आमदार लहु कानडे यांनी नवराञ उत्सवातील कार्यक्रम व भाविकांना शुभेच्छा देणारे फ्लेक्स लावले होते.शनिवारी राञी 9 नंतर रविवारी सकाळी 5 वाजे पुर्वी अज्ञात व्यक्तीने हे फ्लेक्स फाडले आहे.यापुर्वी फ्लेक्स फाडण्याच्या तीन तेचार घटना घडलेल्या आहेत.पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने फ्लेक्स फाडणाऱ्या अज्ञात व्यक्तीचे मनोबल वाढले आहे.असाच प्रकार वारंवार झाल्यास भविष्यात त्याचे तीव्र पडसाद उमटतील.
देवळाली प्रवरा शहरात नवराञ उत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.त्या कार्यक्रमाचे व नवराञ उत्सवाच्या शुभेच्छाचे हे फ्लेक्स लावले होते.यामध्ये माजी खा.सदाशिव लोखंडे व श्रीरामपूरचे भावी आमदार प्रशांत लोखंडे आणि आमदार लहु कानडे यांचे हे फ्लेक्स होते.
शनिवारी राञी 9 च्या नंतर रविवारी पहाटे 5 वाजण्यापुर्वी अज्ञात व्यक्तीने सोसायटी चौकातील व बाजारतळावरील असे दोन फ्लेक्स फाडण्यात आले.आ.कानडे यांचे बाजारतळावर लावण्यात आलेले फ्लेक्स फाडण्यात आले.कारदेशिर कारवाई करण्यापुर्वी फ्लेक्स बांधणाऱ्या तरुणाने तातडीने गोळा करुन घेतले.हे फ्लेक्स फाडण्यामागे हाथ कुणाचा असावा या बाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.फ्लेक्स बांधण्यासाठी अनेक फ्लेक्स येतात पण जागे आभावी बांधता येत नसल्याने फ्लेक्स उभारण्यासाठी जागा शोधावी लागते.हा सर्व ञास टाळण्यासाठीतर बांधणाऱ्या तरुणानेच राञी फाडले असावे असा संशय व्यक्त केला जात आहे.
याबाबत माजी खा.सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव प्रशांत लोखंडे यांच्याशी संपर्क साधला असता.राहुरी पोलिस ठाण्यात रितसर तक्रार केली आहे.पोलिसांनी फ्लेक्स फाडणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतील असे लोखंडे यांनी सांगितले.आ.लहु कानडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नसल्यामुळे त्यांची प्रतिक्रिया समजु शकली नाही.
याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात संपर्क साधला असता राञी उशिरा पर्यंत फ्लेक्स फाडण्या बाबत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही.आसे ठाणे अंमालदार यांनी सांगितले.