देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
देवळाली प्रवरा येथिल राजवाडा भागातील सुरेश पंडीत यांच्या घरा जवळील नाराळाच्या झावळ्या तोडीत असताना मुख्य विज वाहिनीवर तोडलेली झावळी पडली.हि झावळी ओढीत असताना तरुण मजुर मनोज दामोदर ऊमाप (वय 30 वर्ष) यास विजेचा शाँक लागुन जागिच ठार झाला.
याबाबत समजलेली माहिती अशी की, देवळाली प्रवरा येथिल राजवाडा भागातील सुरेश पंडीत यांच्या घरा जवळील नाराळाच्या झाडाच्या झावळ्या तोडण्यासाठी सुरेश पंडीत याने मनोज ऊमाप या मजुरास सांगितले होते.ऊमाप हा नारळाच्या झावळ्या तोडीत असताना एक झावळी मुख्य विज वाहिनीच्या तारेत गुंतली हि झावळी ओढण्यासाठी ऊमाप याने झावळीस हात लावताच विजेचा जबरदस्त शाँक बसल्याने झावळीस चिटकुन बसला.त्याचा जागेवरच मृत्यू झाला.
घटनास्थळावरुन रविंद्र देवगिरे यांच्या रुग्णवाहीनीतून उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.परंतू जागेवरच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय सुञांनी सांगितले.राहुरी पोलिस ठाण्यात याबाबतची माहिती वैद्यकिय सुञांनी दिली असता राहुरी पोलिसांनी आकस्मत मृत्यू ची नोंद केली आहे.पोलिस ठाण्याच्या आवारात मनोज ऊमाप याचा लहान बंधु याने सुरेश पंडीत हा माझ्या भावाच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचे पोलिसांना ओरडून सांगत होता.पंडीत विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी संतप्त नातेवाईक करत होते.
राहुरी पोलिसांनी माञ आकस्मत मृत्यू चा गुन्हा दाखल करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.पुढील तपास राहुरीचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.