देवळाली प्रवरा-आंबी रस्त्याच्या भुमिपुजनाला वर्ष झाले, कामाला मुहुर्त मिळेना 

0
दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला आंबी-देवळाली प्रवरा रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून वर्षभरापासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. (छाया : संदिप पाळंदे)

रस्त्याचा 25 कोटीचा निधी पळविल्याची चर्चा 

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

                 श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील सुमारे सात कोटींच्या विविध विकासकामांचे उद्घाटन मतदारसंघाचे आमदार लहू कानडे यांच्या शुभहस्ते व युवक काँग्रेसचे महासचिव करण ससाणे यांच्या प्रमुख उपस्थितीय गेल्या एक वर्षापूर्वी आंबी (ता. राहुरी) येथे करण्यात आले होते. उद्घाटना नंतर गेल्या एक वर्षात उद्घाटनाचे फलक चोरीला गेले. रस्त्याचे प्रत्यक्ष काम अद्याप सुरु झाले नसुन ‘रोडकरी’ आमादारही या भागात फिरकलेच नाही.येथिल प्रवाशांना आता हा रस्ता नाही झाला तरी चालेल पण भिक नको…. तुमचे कुञे आवरा….. असे म्हणण्याची वेळ आली आहे.

             विकासकामांमध्ये राहुरी तालुक्यातील वर्दळीचा असलेल्या आंबी ते देवळाली प्रवरा या सुमारे एक किमीच्या रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचा समावेश केला होता. त्यासाठी ‘रोडकरी’ आमदार लहू कानडे यांनी तब्बल २५ लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला होता. या रस्त्याच्या भुमिपुजनाला तब्बल एक वर्ष उलटूनही गेले तरी प्रत्यक्षात कामाला अजूनही सुरुवात न झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.या परीसरातील नागरीकांची ‘रोडकरी’ आमदारांनी केवळ भुमिपुजन करुन तुमचा रस्ता विकास कामात घेतला आहे.हे दाखविण्यासाठी तर भुमिपुजन केले नाही ना.?

             या रस्त्यासाठी मंजूर झालेला निधी कुठे गायब झाला का?त्याच निधीतून ‘रोडकरी’ आमदारांनी मर्जितील दुसरा रस्ता केला का? ठेकेदाराला प्रत्यक्ष कामाला अजून मुहूर्त का मिळाला नाही? सरकार बदलल्यामुळे या रस्त्याला ‘स्थगिती’ मिळाली आहे का? या रस्त्याचा निधी इतरत्र दुसऱ्या कामासाठी वापरला गेला का? असा सवाल प्रवासी वर्गातून विचारला जात आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिक व प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार, दुग्धव्यवसायिक यांना मोठा त्रास होत आहे. 

               ‘रोडकरी’ आमदार यांनी या रस्त्याने चारचाकी तर सोडा दुचाकी चालवून दाखवावी असे आवाहन स्थानिक नागरीकांनी केले आहे.या रस्त्याच्या निधी बाबत व ठेकेदाराने एक वर्षात काम का सुरु केले नाही याची माहिती “रोडकरी’ आमदार कानडे यांनी द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन हाथी घ्यावे लागेल.असा इशारा स्थानिक गावकऱ्यांनी दिला आहे.

============

“आंबी-देवळाली प्रवरा रस्त्याचे प्रत्यक्ष काम एक वर्षांपासून रखडले असले तरी मजबुतीकरण व डांबरीकरण काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आमदार लहू कानडे  यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होईल अशी आशा आहे.”

– विजय डुकरे (उपसरपंच, आंबी)

 उद्घाटनाचा फलकाला फुटले पाय?

           आमदार लहू कानडे यांच्या हस्ते आंबी ते देवळाली प्रवरा या रस्त्याच्या 25 लक्ष रुपये खर्चाच्या मजबुतीकरण व डांबरीकरण भुमिपुजनाची साक्ष देणारा व आ. कानडे यांनी स्वतः फीत कापलेला माहिती देणारा फलक ‘गायब’ झाल्याने या फलकला पाय फुटले की कोणी गायब केला?भुमिपुजना नंतर या रस्त्यास स्थगिती मिळाल्याने शासकीय अधिकाऱ्यांनी हा फलक काढुन नेला का? सध्या नागरीकांमध्ये या रस्त्याला कायमस्वरूपी ‘स्थगिती’  मिळाली असल्याची चर्चा जोर धरीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here