देवळाली प्रवरा नगर पालिका कार्यालयातील चंदनाच्या झाडाची चोरी 

0

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

                  देवळाली प्रवरा नगर पालिका कार्यालयाच्या आवारातील दत्त मंदिरा शेजारी असणारे चंदनाचे झाड बुधवारी 11 ते गुरवारी पहाटे 4 वाजे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी वाँचमनच्या निगराणीखाली असलेल्या पालिका आवारातून अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयाचे चंदन चोरुन नेले . हि घटना गुरवारी सकाळी उघडकीस आली.

          याबाबत समजलेली माहिती आशी की देवळाली प्रवरा नगर पालिका आवारातील दत्त मंदिरा शेजारील सुमारे 17 ते 18 वर्षाचे जुने चंदनाचे झाड अज्ञात चोरट्यांनी बुधवारी राञी 11 ते गुरवारी पहाटे 4 वाजे दरम्यान चोरुन नेले.कार्यालयाच्या आवारात सीसीटिव्ही कार्यरत असतानाही या सीसीटिव्ही फुटेज मध्ये चोरांचे चिञीकरण टिपले नाही. यावरुन नगर पालिकेतील कामगार या चोरट्यांना सामिल आहे का?असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला आहे.

          दरम्यान देवळाली प्रवरा पोलीस चौकीचे पो.हे.काँ. प्रभाकर शिरसाठ यांनी पहाणी केली आहे.मुख्याधिकारी अजित निकत यांनी पोलीस निरीक्षक राहुरी यांना पञाद्वारे लेखी तक्रार दाखल केली आहे. नगर पालिकेचे दोन वाँचमन असतानाही अज्ञात चोरट्यांनी चंदनाचे झाड चोरुन नेले कसे?या बाबत पोलिस पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here