नगर – बाबा बंगली रोड येथील रहिवासी नईम खान लतीफ यांचे नुकतेच निधन झाले. मृत्यू समयी ते 50 वर्षांचे होते. त्यांच्यावर येथील जलाल शाह बुखारी कब्रस्तानमध्ये दफनविधी करण्यात आला. याप्रसंगी विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.
नईम खान यांच्या पश्चात आई, भाऊ, बहिणी असापरिवार आहे. ते धार्मिक व मनमिळावू स्वभावाचे होते, त्यामुळे त्यांचा मोठा मित्र परिवार होता. ते बिल्डर या नावाने सुपरिचित होते. सामाजिक कार्यकर्ते अय्यबु खान यांचे चुलत बंधू तर समाजसेवक मुन्ना खान यांचे ते मोठे बंधू होत. त्यांचे निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.