दत्त बेकरी व ए.आर.ट्रेडर्सच्यावतीने केक फेस्टीव्हलचे आयोजन
नगर – अबालवृद्धांपासून सर्वांचा आवडता पदार्थ म्हणजे ‘केक’ होय. या केकचे अनेक प्रकार, फ्लेव्हर मध्ये उपलब्ध आहेत. अशाच विविध केकचे दत्त बेकरीच्यावतीने फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये फेस्टीव्हलमध्ये येथील ए.आर.ट्रेडर्स, प्रिस्टरिन व आलाना कंपनी च्यावतीने विविध फ्लेव्हरचे व आकाराचे केक ठेवण्यात आले होते. यामध्ये पायनापल, ऑरेंज, मँगो, ब्लॅकबेरी, बासुंदी, चोकोलाव, ब्राऊणी, मावा, ब्लॅक फॉरेस्ट, व्हाईट कॉरेटर, मकिन कैक असे पिवर व्हेज विविध केकचा आस्वाद नागरिकांनी घेतला.
चितळे रोड येथील दत्त बेकरीच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त ए.आर.ट्रेडर्स, प्रिस्टरिन व आलाना कंपनीच्यावतीने ‘केक फेस्टीव्हल’चे आयोजन करण्यात आले होते. या फेस्टीव्हलचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते संजय झिंजे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रिस्टरिन कंपनीचे समीर शेख, दत्त बेकरीचे प्रताप परदेशी, तय्याब शेख, किशनसिंग परदेशी, इलाई शेख, डॉ.कवडे, रणजित परदेशी, सुधीर परदेशी, अनिल काळे, अशोक पालवे, मिर्झा फैय्याज, शेळके पैलवान, डॉ.करण गाडे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी समीर शेख म्हणाले, ए.आर. ट्रेडर्स कंपनीच्यावतीने केकच्या नवनवीन व्हराईटज तयार करण्यात येत असून, त्यासाठी आवश्यक त्या मटेरिअलचा पुरवठा केला जात आहे. त्याचबरोबरच केक तयार करण्याची पद्धतीचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन केले जात आहे. या मटेरियलच्या सहाय्याने कोणीही स्वत: चांगला व स्वादिष्ट केक बनवू शकतो. दत्त बेकरी गेल्या अनेक वर्षांपासून या व्यावसायात उत्कृष्ट सेवा देत आहे. दर्जेदार उत्पादनाबरोबर नामांकित कंपन्यांचे साहित्य या ठिकाणी उपलब्ध असल्याने ग्राहकांची मोठी पसंत दत्त बेकर्सला मिळत आहे.
यावेळी दत्त बेकरीचे प्रताप परदेशी म्हणाले, गेल्या 60 वर्षांपासून दत्त बेकरीच्या माध्यमातून ग्राहकांच्या पसंतीनुसार बेकरी पदार्थांची विक्री केली जात आहे. या व्यवसायातील होत असलेल्या बदलांचा स्वीकार करत दर्जेदार उत्पादनाबरोबरच नामांकित कंपन्यांचे साहित्याची विक्री करण्यात येत असल्याने ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. आज वर्धापन दिनानिमित्त ़केक फेस्टीव्हलच्या माध्यमातून नगरकरांना विविध फ्लेव्हरच्या केकचा आस्वाद घेतला असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुधीर परदेशी यांनी केले तर आभार तय्याब शेख यांनी मानले.