नगरमधील खाजगी रुग्णालयाचा प्रताप; रुग्णावर चक्क गोदामामध्ये उपचार..

0

अहमदनगर प्रतिनिधी : अहमदनगर शहरातल्या तारकपूर बसस्थानकासमोर असलेल्या एका खासगी रुग्णालयात नुकताच एक संतापजनक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. या खासगी रुग्णालयात अपघातात जखमी झालेल्या एका रुग्णाला चक्क गोडाऊनमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं. या संदर्भात संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांनी सोशल मिडियावर एक व्हिडिओ टाकला. त्यानंतर संबंधित मुजोर डॉक्टर भानावर आला आणि रुग्णाला जनरल वार्डमध्ये ॲडमिट करण्यात आलं.

राहुरी तालुक्यातल्या कोंढवड इथला हा रुग्ण एका अपघातात जखमी झाला होता. या रुग्णाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्याच्या नातेवाईकांनी पैसे जमा करुन त्याला दवाखान्यात ॲडमिट केलं. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनीदेखील या कुटुंबाला आर्थिक मदत केली.

संबंधित डॉक्टरनं या रुग्णाच्या नातेवाईकांना कुठलीही दया माया नं दाखवता अडीच लाख रुपये मागितले. या रुग्णाच्या नातेवाईकांनी औषधांचे ८० हजार आणि दवाखान्याचं बील ४५ हजार रुपये भरले. मात्र रुग्णाला चक्क गोडाऊनमध्ये ॲडमिट करण्यात आल्यानं नातेवाईकांच्या तळपायाची आग मस्तकापर्यंत गेली.

या संदर्भात संबंधित रुग्णाचे नातेवाईक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रार करणार आहेत. राज्याचं सरकार लाडकी बहीण योजना सुरू करून जनतेला भुलवण्याचं काम करत आहे. मात्र दुसरीकडे नगरमध्ये डॉक्टरनं अशा पद्धतीनं उपचार देऊन गोरगरीब जनतेची थट्टा सुरु केली आहे. या डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी रुग्णाच्या नात्वैकानी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here