नगरला शिस्तप्रिय आयुक्तांची नियुक्ती करावी : माजी महापौर भगवान फुलसुंदर

0

नगर ;- नगरला महापालिका दर्जा मिळाल्यानंतर महानगर होण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने आवश्यक त्या निधीसह कणखर आयुक्त देण्यात यावा, या मागणीचे निवेदन प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पाठविले आहे.

     निवेदनात म्हटले आहे की, मी प्रथम महापौर झाल्यानंतर शहर विकासाचे ध्येय ठेवून स्व.अनिलभैय्या राठोड व सर्व पक्षीय सहकार्याने विकास कामांसाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. आज किमान मुलभुत गरजा, सेवा-सुविधा या सुरळीत नाहीत. भ्रष्टाचार हा शिष्टाचार बनला असून, नगरची जनताही हवालदिल झालेली आहे.

     तरी अशा परिस्थितीमध्ये महानगरपालिकेचे प्रशासन व्यवस्थीत व परिणामकारकरित्या चालविण्यासाठी नगरला कडक शिस्तीच्या व भ्रष्टाचाराचा डाग नसलेले आयुक्त येणे अनिवार्य आहे. म्हणून मा.मुख्यमंत्री साहेब व उपमुख्यमंत्री यांना कळकळीचे आवाहन करीत आहे. विशेषत: भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नगर जिल्ह्याचे त्यांच्या पक्षाचे पालकत्व घेतले असल्याने त्यांनी नगरसाठी लक्ष देऊन परिणामदायी निर्णय घ्यावेत.

     नगरची वाढती ताबेमारी, गुंडगिरी, तरुणांमध्ये नशेचे वाढते प्रमाण, वाहतुक समस्या, रोजगार निर्मिती, दादागिरी, दहशत या समस्यांचे निराकरणासाठी व वीज, पाणी, रस्ते या मुलभुत सेवा सुविधांच्या निराकरणासाठी सक्षम प्रशासनासाठी तुकाराम मुंढे यांच्यासारखे कणखर व कडक शिस्तीचा किंवा आयएएस दर्जाचे आयुक्त नगर महानगरपालिकेला देण्याची मागणी भगवान फुलसौंदर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here