नगर शहर व जिल्ह्यातून पंढरपुरला जाणार्‍या पायी दिंडीस पोलिस बंदोबस्त मिळावा

0
फोटो - जिल्ह्याच्या हद्दीतून पंढपुरला जाणार्‍या दिंड्या व वारकर्‍यांना सुरक्षा पुरविण्यात यावी, या मागणीचे निवेदन जिल्हा वारकरी संघाच्यावतीने हभप विश्वनाथ राऊत यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक व निवासी उपजिल्हाधिकारी यांना दिले. (छाया : सुरेश मैड)

वारकरी संघाची पोलिस अधिक्षकांकडे मागणी

 नगर – प्रतिवर्षी अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीतून विविध जिल्ह्यातील लाखो वारकरी आषाढी एकदाशीनिमित्त पंढपुरला पायी दिंडीने जात असतात, या दिंड्या व वारकर्‍यांना सुरक्षा पुरविण्यात यावी, या मागणीचे निवेदन जिल्हा वारकरी संघाच्यावतीने अध्यक्ष हभप विश्वनाथ राऊत यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक व निवासी उपजिल्हाधिकारी यांना दिले.

     निवेदनात म्हटले आहे की, यंदा आषाढी वारी दि.29जून 2023 रोजी आहे. यानिमित्त अनेक दिंड्या वेगवेगळ्या मार्गाने अहमदनगर शहरात येतात तेथून सोलापुर महामार्गाने करमाळा मार्गे पंढरपुरकडे मार्गस्त होतात, त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनमधील वाहतुक विभागास दिंडी बंदोबस्तासाठी सूचना द्याव्यात.

     यापुर्वी महामार्गावर मोठ्या वाहनांमुळे अपघात झाल्याने वाकर्‍यांना प्राणास मुकावे लागले आहे. नगर शहर हद्दीत बेशिस्त वाहतुकीचा सामना करावा लागतो. शहरातील विशिष्ट भागातून दिंडी मार्गस्थ होत असतांना उपद्रवी घटकांकडून जाणून-बुजन होणारे अनुचित प्रकार टाळणे कामी सर्वांना दक्षतेचे आदेश द्यावेत.

     किमान शहर हद्दीतून दिंडी मार्गस्थ होईपर्यंत वाहतुक कमृचारी बरोबर देऊन सहकार्य करावे. वेगवेगळ्या दिंडी सोहळ्याचे वेळापत्रक आम्हास उपलब्ध होईल, तसे शहर वाहतुक शाखेय आमच्याकडून कळविण्यात येईल, असेही निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here