नागपूर मुंबई महामार्गावरील पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापकाची निर्घृण हत्या

0

कोपरगाव :कोपरगाव तालुक्यातील शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंबई-नागपूर महामार्गावर असलेल्या दहिगाव बोलका गाव हद्दीतील रेल्वे उड्डाण पुला जवळ नव्यानेच सुरू झालेल्या
जगताप यांच्या पेट्रोल पंपावरील व्यवस्थाकाचा अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना गुरुवार दिनांक 29 जून २०२३ रोजी संध्याकाळी 7.30 वा. दरम्यान घडली.
मयत व्यक्तीचे नाव बापू बाबुराव घनघाव (वय ४५) असून ते दहीगाव बोलका ता. कोपरगाव येथील रहिवासी आहेत.
याबाबत शहर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकी वरून आलेल्या तीघाजनांनी पेट्रोल भरण्यावरून झालेल्या वादातून घनघाव यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात ते
गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यांना गंभीर जखमी अवस्थेत दाखल केले असता उपचार सुरू असताना रुग्णालयात मृत्यू झाला. या वेळी घनघाव यांना वाचवण्यास गेलेल्या आणखी एक जण गंभीर जखमी झाला असून त्यास पुढील उपचारासाठी लोणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच कोपरंगाव शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही फुटेज वरून तपासाला सुरुवात केली आहे.

या गुन्ह्य़ातील तीनही आरोपी हे गावातीलच असून गुन्ह्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
घटनेनंतर आरोपीनी घटनास्थळावरून पलायन केले असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. यातील एक आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याची
माहिती आहे. मात्र हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान पेट्रोल पंपासमोरील हॉटेल मध्ये जेवण झाल्यानंतर आरोपींचे तेथेही वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी
पेट्रोल टाकण्यासाठी पंपावर गेले
असता . बिलावरून झालेल्या वादातून सदर घटना घडल्याची चर्चा आहे.
यातील मयत बापू घनघाव यांचे पश्चात आई, वडील, पत्नी व
दोन मुले आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधीक तपास पोलीस करीत असून आरोपींना लवकरच बेड्या ठोकू असा विश्वास पोलीसांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here